JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Aus vs Eng: लाईव्ह मॅचमध्ये चिमुरड्यानं मागितला शर्ट, 'या' खेळाडूनं ड्रेसिंग रुममधून दिला भन्नाट रिप्लाय; पाहा Video

Aus vs Eng: लाईव्ह मॅचमध्ये चिमुरड्यानं मागितला शर्ट, 'या' खेळाडूनं ड्रेसिंग रुममधून दिला भन्नाट रिप्लाय; पाहा Video

Aus vs Eng: सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या एका छोट्या फॅननं डेव्हिड वॉर्नरकडे शर्टची मागणी केली. त्यावर वॉर्नरनही ड्रेसिंग रुममधून भन्नाट रिप्लाय दिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

छोट्या फॅनची वॉर्नरकडे अजब मागणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया आणि टी20 चॅम्पियन इंग्लंड संघात आज अॅडलेडच्या मैदानात वन डे सामना पार पडला. डेव्हिड मलानच्या शतकानंतरही इंग्लंडला या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. पण या सामन्यात लक्ष वेधून घेतलं ते एका लहानग्या फॅननं. सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या या फॅननं डेव्हिड वॉर्नरकडे शर्टची मागणी केली. त्यावर वॉर्नरनही ड्रेसिंग रुममधून भन्नाट रिप्लाय दिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वॉर्नर चिमुरड्याची मागणी पूर्ण करणार? स्टँड्समध्ये बसलेल्या या मुलानं एका कागदावर ‘वॉर्नर मला तुझा शर्ट मिळेल का?’ असं लिहून ते कॅमेऱ्यासमोर धरलं. हे दृश्य ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या वॉर्नरनं पाहिलं. त्यावर त्यानं रिप्लाय दिला की ‘मार्नस लाबुशेनकडे माग’. ते पाहून या मुलानं शक्कल लढवली. त्यानं पुन्हा कागदावर ‘मार्नस मला तुझा शर्ट मिळेल का?’ असं लिहून मागणी केली. मॅचदरम्यान या मुलाच्या या कारनाम्याची चांगलीच चर्चा झाली.

संबंधित बातम्या

सामन्यानंतर डेव्हिडनं दिला शब्द मॅचनंतर डेव्हिड वॉर्नरनं इन्स्टाग्रामनवर एक स्टोरी टाकून त्या मुलाला येत्या कसोटी मालिकेवेळी नक्की शर्ट देणार असा शब्द दिला आहे.

वॉर्नरची निर्णायक खेळी दरम्यान अॅडलेडच्या वन डेत डेव्हिड वॉर्नच्या दमदार खेळीनं ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. टी20 आणि वन डे चॅम्पियन इंग्लंडनं या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 288 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथनं अर्धशतकं झळकावली आणि ऑस्ट्रेलियानं चार ओव्हर बाकी ठेऊन ही मॅच जिंकली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या