JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'Shahid Afridi कॅरेक्टरलेस', पाकिस्तानच्याचं माजी क्रिकेटरचा खळबळजनक आरोप

'Shahid Afridi कॅरेक्टरलेस', पाकिस्तानच्याचं माजी क्रिकेटरचा खळबळजनक आरोप

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं (Danish Kaneria ) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi characterless) जोरदार निशाणा साधला आहे.

जाहिरात

Shahid Afridi characterless

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 एप्रिल: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं (Danish Kaneria ) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर जोरदार निशाणा साधला आहे. शाहिद आफ्रिदी हा लबाड आणि चारित्र्यहीन माणूस असल्याचं दानिश कनेरियानं म्हटलं आहे. एवढेच नव्हेतर, शाहिद आफ्रीदी संघातील इतर खेळाडूंना त्याच्याविरुद्ध भडकावायचा, असाही दानिश कनेरियानं आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कनेरियानं शाहिद आफ्रिदीसंदर्भात भाष्य केले आहे. तो म्हणाला, शाहिद आफ्रिदीने अनेकदा माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दोघे फिरकीपटू म्हणून खेळायचो. परंतु, मी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळावं, असं त्याला वाटत नव्हतं. मी पाकिस्तानच्या संघात नसावं, असं त्याला वाटायचं. आईला पटवण्यासाठी साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेटरला गर्लफ्रेंडसोबत करावा लागला कथ्थक डान्स तो लबाड आणि चारित्र्यहीन आहे. माझं लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यावर होतं. ज्यामुळं मी अशा गोष्टींवर दुर्लक्ष करायचो. शाहित आफ्रिदी नेहमी माझ्याविरुद्ध संघातील इतर खेळाडूंना भडकावायचा, असे गंभीर आरोप दानिश कनेरियानं केले आहेत. मी चांगली कामगिरी करायचो त्यामुळे त्याला माझा हेवा वाटायचा. मी पाकिस्तानसाठी खेळलो, त्याचा मला अभिमान आहे. यासाठी मी पीसीबीचा आभारी आहे. असा उल्लेखही त्याने यावेळी केला. दानिश कनेरिया हा कसोटी क्रिकेटमध्ये 261 विकेट्स घेणारा फिरकीपटू आहे. पाकिस्तानकडून वसीम आक्रम (414), वकार युनिस (373) आणि इमरान खान (362) दानिश कनेरिया पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. कनेरियानं आपल्या 10 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत 61 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं 34.79 च्या सरासरीनं 261 विकेट्स घेतल्या आहेत. तर, 18 एकदिवसीय सामन्यात 45.53 च्या सरासरीनं 15 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या