JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Test Championship : पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा फायदा

World Test Championship : पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा फायदा

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात लाहोरमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये यजमान टीमचा 115 रननं मोठा पराभव झाला. पाकिस्तानला या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 मार्च : पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात लाहोरमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये यजमान टीमचा 115 रननं मोठा पराभव झाला. पाकिस्तानला या पराभवाचा मोठा फटका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) बसला आहे. तर, टीम इंडियाला याचा फायदा झाला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानची टीम दुसऱ्या क्रमांकानंतर चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. तर ऑस्ट्रेलियानं पहिल्या क्रमांकावरची जागा आणखी भक्कम केली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर टीम इंडियानं चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा क्रमांक कायम आहे. ऑस्ट्रेलिया 75 टक्के विजयासह टॉपवर आहे. त्यांनी 5 मॅच जिंकल्या असून 3 ड्रॉ केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची टक्केवारी 60 आहे. त्यांनी 3 मॅच जिंकल्या असून 2 गमावल्या आहेत. भारतीय टीम 6 विजय, 3 पराभव आणि 2 ड्रॉ या कामगिरीनंतर 58.33 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 3 विजय, 2 पराभव आणि 2 ड्रॉ सह 52.38 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने लाहोरमध्ये विजय मिळवत तीन टेस्ट मॅचची ही सीरिज 1-0 ने आपल्या नावावर केली आहे. रावळपिंडी आणि कराचीमध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही टेस्ट ड्रॉ झाल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 351 रनचं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना पाकिस्तानची टीम पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात 235 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने (Nathan Lyon) 83 रन देऊन 5 विकेट घेतल्या. हा ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानच्या जमिनीवरचा तिसरा टेस्ट सीरिज विजय आहे. 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. IPL 2022 CSK vs KKR : आयपीएलचा थरार आजपासून सुरू, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming? याआधी 1998 साली झालेल्या दौऱ्यातही ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने पराभव केला होता. त्यावेळी रावळपिंडीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 99 रनने विजय झाला होता. यानंतर पेशावर आणि कराचीमध्ये झालेली दुसरी आणि तिसरी टेस्ट ड्रॉ झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या