JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : भारताच्या मोठ्या विजयानंतर स्मृतीचा दिलदारपणा, आनंदाच्या क्षणी जिंकलं 'हरमन'

Women's World Cup : भारताच्या मोठ्या विजयानंतर स्मृतीचा दिलदारपणा, आनंदाच्या क्षणी जिंकलं 'हरमन'

भारतीय महिला टीमनं (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताच्या या मोठ्या विजयानंतर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) तितकंच मोठं मन असल्याचं दाखवून दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च : भारतीय महिला टीमनं (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा (India Women vs West Indies Women) तब्बल 155 रननं पराभव केला. भारताने दिलेलं 318 रनचं आव्हान वेस्ट इंडिजला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम  40.3 ओव्हर्समध्ये 162  रनवर ऑल आऊट झाली. या विजयानंतर टीम इंडियानं वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताच्या या मोठ्या विजयानंतर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) तितकंच मोठं मन असल्याचं दाखवून दिलं आहे. स्मृतीनं या मॅचमध्ये दमदार शतक झळकावलं. तिनं भारताकडून सर्वाधिक 123 रनची खेळी केली. स्मृतीनं 119 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं ही खेळी केली. ओपनिंगला आलेल्या स्मृतीनं सुरूवातीला शांत खेळ केला.  मैदानात जम बसल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली.

संबंधित बातम्या

स्मृतीची या खेळीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारासाठी निवड झाली. त्यावेळी स्मृतीनं मनाचा मोठेपणा दाखवत हा पुरस्कार  या मॅचमध्ये  तिच्यासोबत विक्रमी भागिदारी करणाऱ्या हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सोबत शेअर केला.  हरमन आणि स्मृती या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 184 रनची मोठी भागिदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय टीमसाठी ही सर्वोच्च भागिदारी आहे. हरमननंही यावेळी शतक झळकावलं. तिने 107 बॉलमध्ये 109 रन काढले. Women’s World Cup : टीम इंडियाचा रेकॉर्ड कायम, वेस्ट इंडिज विरूद्ध मिळवला मोठा विजय स्मृतीनं ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार हरमनसोबत शेअर केला. ‘शतक झळकावल्यानंतरही ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार न मिळणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी आणि हरमननं हा पुरस्कार एकत्र शेअर करणे अधिक योग्य असेल,’ असे स्मृतीनं यावेळी सांगितलं. स्मृतीनं दाखवलेल्या या मोठेपणाचं सर्वजण कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या