JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : स्मृतीनंतर हरमनचही शतक, टीम इंडियाचं दमदार कमबॅक!

Women's World Cup : स्मृतीनंतर हरमनचही शतक, टीम इंडियाचं दमदार कमबॅक!

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup) भारतीय महिला टीमच्या बॅटर्सनी (Team India Women) जोरदार कमबॅक केलं आहे.

जाहिरात

फोटो - @BCCIWomen

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup)  भारतीय महिला टीमच्या बॅटर्सनी (Team India Women) जोरदार कमबॅक केलं आहे. न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय टॉप ऑर्डरवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी वेस्ट इंडिज  विरूद्धच्या मॅचमध्ये (India Women vs West Indies Women) भारतीय टीमनं कमबॅक केलं आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध सुरू असलेल्या मॅचमध्ये सर्वप्रथम स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) शतक झळकावलं. त्यानंतर व्हाईस कॅप्टन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) देखील शतक झळकावलं आहे. हरमननं हे शतक 100 बॉलमध्ये झळकावलं.  या खेळीत तिने 8 फोर आणि 2 सिक्स लगावले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वी हरमन फॉर्मात नव्हती. त्यानंतर या वर्ल्ड हरमन खराब फॉर्मची भरपाई केली आहे. यापूर्वी न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या मॅचमध्येही तिने अर्धशतक झळकावले होते.

संबंधित बातम्या

हरमन आणि स्मृती या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 184 रनची मोठी भागिदारी केली. स्मृतीनं 119 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्ससह 123 रन केले. हरमननं स्मृतीच्या बरोबरीनं खेळ करत वन-डे करिअरमधील चौथे शतक झळकावले. वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे हे तिसरे शतक आहे. हरमननं यापूर्वी 2013 आणि 2017 मधील वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले आहे. Women’s World Cup : स्मृती मंधानाची बॅट तळपली, वेस्ट इंडिज विरूद्ध दमदार शतक! स्मृती आणि हरमन यांच्या शतकानं टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरूद्ध भक्कम स्कोअर उभा केला. भारतीय टीमनं 275 रनचा टप्पा ओलांडला आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजची टीम फॉर्मात आहे. त्यांनी यजमान न्यूझीलंड आणि वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला होता. पण, स्मृती-हरमन जोडीनं वेस्ट इंडिजच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या