JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा केला मोठा पराभव, 9 व्यांदा फायनलमध्ये धडक

Women's World Cup : ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा केला मोठा पराभव, 9 व्यांदा फायनलमध्ये धडक

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम (Australia Women Cricket Team) न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायमलमध्ये पोहचली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा 157 रननं मोठा पराभव केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च : ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम (Australia Women Cricket Team) न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायमलमध्ये पोहचली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा 157 रननं मोठा पराभव केला. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. ऑस्ट्रेलियानं लीग स्टेजमधील सर्व सात सामने जिंकले होते. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना 45-45 ओव्हर्सचा झाला. ऑस्ट्रेलियानं महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी सहा वेळा या टीमनं विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना 45 ओव्हर्समध्ये 3 आऊट 305 असा मोठा स्कोअर केला. ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हिलीनं सर्वात जास्त 129 रन काढले. तसंच रेचेल हेन्सनं 85 रनची खेळी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 216 रनची भागिदारी केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये मूनीनं 31 बॉलमध्ये 43 रन करत ऑस्ट्रेलियाला 300 रनच्या पार पोहचवले.

संबंधित बातम्या

वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 306 रनचे टार्गेट होते. त्या टार्गेटचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम 37 ओव्हर्समध्ये 148 रनवरच ऑल आऊट झाली. वेस्ट इंडिजकडून कॅप्टन स्टेफनी टेलरनं सर्वात जास्त 48 रन केले. टेलरचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला कमाल करता आली नाही. 6 जणींना तर दोन अंकी रनही करता आले नाहीत. IPL 2022 मधील पहिला वाद! विल्यमसनच्या विकेटवर SRH चे कोच नाराज, म्हणाले… वेस्ट इंडिजची पहिली विकेट 12 रनवर पडली. रशादा विलियम्स एकही रन न करता आऊट झाली. त्यानंतर डियांड्रा टॉटीन 35 बॉलमध्ये 34 रन काढून आऊट झाली. हॅली मॅथ्यूजच्या रूपाने वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला. मॅथ्यूज 34 रनवर परतली. या तीन धक्क्यानंतर त्यांची टीम सावरलीच नाही. ऑस्ट्रेलियाकडून पाच बॉलर्सना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर जेस जोनासेननं 2 विकेट्स घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या