JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : राशिदला होता विजयाचा विश्वास, शेवटच्या ओव्हरमध्ये तेवातियाला सांगितलं आणि केला चमत्कार!

IPL 2022 : राशिदला होता विजयाचा विश्वास, शेवटच्या ओव्हरमध्ये तेवातियाला सांगितलं आणि केला चमत्कार!

साधारणपणे स्पिन बॉलिंगच्या जोरावर मॅचचं चित्र बदलणाऱ्या राशिद खाननं (Rashid Khan) बुधवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरूद्ध शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत गुजरात टायटन्सनंला (Gujarat Titans) विजय मिळवून दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल : साधारणपणे स्पिन बॉलिंगच्या जोरावर मॅचचं चित्र बदलणाऱ्या राशिद खाननं (Rashid Khan) बुधवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरूद्ध शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) विजय मिळवून दिला. गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रन हवे होते. राहुल तेवातियानं (Rahul Tewatia)  पहिल्या दोन बॉलमध्ये एका सिक्ससह 7 रन केले. त्यानंतर राशिदनं शेवटच्या चार बॉलमध्ये 3 सिक्स लगावत गुजरातला विजय मिळवून दिला. राशिदनं विजयानंतर सांगितलं की, ‘खूप चांगलं वाटत आहे. मला माझी बॅटींग आणि फिटनेसवर विश्वास होता. मी सनरायझर्स विरूद्ध या प्रकराचा खेळ करू शकलो याचा मला आनंद आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून बॅटींगवर मेहनत करत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आम्हाला 22 रन हवे होते. त्यावेळी मी तेवातियाला सांगितलं की, आपल्या टीमचा सर्वश्रेष्ठ बॉलर फर्ग्युसनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 25 रन गेले होते. आता आपली संधी आहे. एक बॉल निर्धाव गेला तरी घाबरण्याची गरज नाही. मॅच फिनिश करायची आहे.’ हैदराबादकडून मार्को जेनसननं शेवटची ओव्हर टाकली.  राशिदने तिसऱ्या आणि पाचव्या बॉलला सिक्स मारली, त्यामुळे गुजरातला अखेरच्या बॉलवर विजयासाठी 3 रन हवे होते, यानंतर अखेरच्या बॉलवर राशिदने पुन्हा एक सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरला विजयासाठी 22 रन हवे असताना गुजरातने 25 रन काढले. IPL 2022 : मुरलीधरन भडकला, डग आऊटमध्ये बसून घातल्या शिव्या, VIDEO कॅमेरामध्ये कैद! हैदराबादविरुद्धच्या या विजयासह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या मोसमात गुजरातने 8 पैकी 7 मॅच जिंकल्या असून फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर हैदराबादची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या