JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs BAN : टेस्ट क्रिकेटमध्ये 12 वर्षांनी पुनरागमन करताच उनाडकटने रचला विक्रम

IND vs BAN : टेस्ट क्रिकेटमध्ये 12 वर्षांनी पुनरागमन करताच उनाडकटने रचला विक्रम

तब्बल 12 वर्षांनी जयदेवला टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि त्याबरोबरच त्याच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर :   भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरू झालीय. पहिल्या टेस्टमधील ‘मॅन ऑफ द मॅच’ असलेल्या कुलदीप यादवऐवजी टीममध्ये जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल 12 वर्षांनी जयदेवला टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि त्याबरोबरच त्याच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली. या संदर्भात ‘दैनिक जागरण’ने वृत्त दिलंय. जयदेव उनाडकटने 2010 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, त्यावेळी त्याला फक्त एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या कारकिर्दीतील एकमेव टेस्ट मॅच सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. आता तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. जयदेवला देशांतर्गत क्रिकेटमधील अप्रतिम कामगिरीनंतर ही संधी देण्यात आली आणि त्याने नवा विक्रम रचला आहे. जयदेवनं रचला विक्रम 12 वर्षांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या उनाडकटने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दोन टेस्ट मॅचेस खेळण्यातील जास्त अंतराच्या बाबतीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मॅचेसदरम्यान भारताने तब्बल 118 कसोटी सामने खेळले. या यादीत उनाडकट दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला काय झालंय? पहिल्या टेस्टच्या हिरोलाच काढलं बाहेर टेस्ट मॅचेस सर्वाधिक अंतराने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी 142 गॅरेथ बॅटी (2005-16) 118 जयदेव उनाडकट (2010-22)* 114 मार्टिन बिकनेल (1993-03) 109 फ्लॉईड रीफर (1999-09) 104 यूनुस अहमद (1969-87) 103 डेरेक शेकलटन (1951-63) 87 दिनेश कार्तिक (2010-18) या यादीत भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या नावाचाही समावेश आहे. या यादीमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमीच्या जागी मिळाली संधी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाल्यानंतर जयदेव उनाडकटचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. शमी दुखापतीमुळे वन-डे सीरिजमधून बाहेर पडला होता. पण टेस्ट सीरिजपूर्वी तो दुखापतीतून सावरू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी उनाडकटला संधी देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या