JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मॅच फिक्सिंगबाबत आयसीसीची कडक कारवाई, क्रिकेटपटूवर घातली 14 वर्षांची बंदी

मॅच फिक्सिंगबाबत आयसीसीची कडक कारवाई, क्रिकेटपटूवर घातली 14 वर्षांची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई करत क्रिकेटपटूवर 14 वर्षांची बंदी घातली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर :    क्रिकेटला फुटबॉलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ मानलं जातं. जगभरात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत. मात्र, कुठल्याही इतर खेळाप्रमाणे क्रिकेटमध्येही भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगची प्रकरणं उघडकीस आली आहेत. आतापर्यंत अनेक खेळाडूंना मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्यामुळे शिक्षा भोगावी लागली आहे. यामध्ये आता संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) एका खेळाडूचा समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मॅच फिक्सिंग प्रकरणात यूएईतील देशांतर्गत क्रिकेटपटूवर 14 वर्षांची बंदी घातली आहे. मेहरदीप छावकर, असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. 2019 मध्ये यूएई आणि झिम्बाब्वे यांच्यातील सीरिजमध्ये आणि त्याच वर्षी कॅनडाच्या जीटी-20 लीगमधील मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप मेहरदीपवर होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान, ट्रिब्युनलनं मेहरदीपला आयसीसी आणि क्रिकेट कॅनडाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेतील ‘कोड सेव्हन’च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवलं. आयसीसीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. या पूर्वी, मेहरदीप छावकरशी संबंधित प्रकरणात आयसीसीनं यूएईच्या दोन क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी घातली होती. छावकर यूएईच्या अनेक अव्वल क्रिकेट क्लबकडून विकेटकीपर बॅट्समन म्हणून खेळला आहे. सुरुवातीला छावकरनं आपल्यावरील मॅच फिक्सिंगचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, खराब कामगिरीसाठी खेळाडूला हेतुपुरस्सर प्रभावित केल्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये आणि अँटिकरप्शन कोडसंबंधी दोन गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला. एवढंच नाही तर मॅच फिक्सिंगच्या आरोपांच्या तपासात सहकार्य न केल्याबद्दलही तो दोषी आढळला. त्यामुळे आयसीसीनं त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. ‘या’ खेळाडूनं परराष्ट्रमंत्र्यांना शिकवले क्रिकेटचे धडे, सचिनचीही काढली आठवण आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल म्हणाले, “2018 मध्ये यूएईमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्यानंतरच मेहरदीप छावकर तपासकर्त्यांच्या नजरेत आला होता. या स्पर्धेतही भ्रष्टाचार झाला होता. तेव्हापासून आयसीसीच्या अँटिकरप्शन युनिटचं छावकरवर लक्ष होतं. यानंतर त्याने 2019 मध्ये यूएई-झिम्बाब्वे सीरिजमधील मॅचेस फिक्स करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कृतीतून तो क्रिकेटचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली.” मॅच फिक्गिंगविरोधात आयसीसी कठोर कारवाई करत असूनही अधूनमधून अशी प्रकरण समोर येतात. काही क्रिकेटपटू झटपट पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा गैरमार्गाचा अवलंब करताना दिसतात. भारतातही आतापर्यंत मॅच फिक्गिंगची अनेक प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, एस. श्रीशांत अशी काही प्रसिद्ध नावं मॅच फिक्गिंगमध्ये समोर आलेली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या