JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / खेळ बदला किंवा बाहेर जा! कपिल देव यांनी टीम इंडियातील सिनिअर खेळाडूंना सुनावलं

खेळ बदला किंवा बाहेर जा! कपिल देव यांनी टीम इंडियातील सिनिअर खेळाडूंना सुनावलं

टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेट टीममधील सिनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जून :  टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेट टीममधील सिनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) या भारतीय क्रिकेट टीममधील सिनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर कपिल नाराज आहेत. हे सिनिअर खेळाडू टीमला सर्वात जास्त गरज असते तेव्हा आऊट होतात, अशी टीका कपिल यांनी केली आहे. ‘एबीपी अनकट’ या कार्यक्रमात बोलताना कपिल देव यांनी सांगितलं की, ‘हे तीघंही मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बराच दबाव असतो, त्या दबावाची गरज नाही. त्यांनी निर्भयपणे क्रिकेट खेळलं पाहिजे. हे तीन्ही खेळाडू 150-160 च्या स्ट्राईक रेटनं रन करू शकतात. आपल्याला त्यांनी रन करण्याची सर्वात जास्त आवश्यकता असते त्यावेळी ते आऊट होतात. ते वेगानं खेळण्याची गरज असतानाच आऊट झाल्यानं इतरांवर दबाव वाढतो.’ कपिल देव यांनी यावेळी केएल राहुलचं उदाहरण देत सांगितलं की, ‘तुम्ही संपूर्ण 20 ओव्हर्स बॅटींग केल्यानंतर 60 रन केले तर टीमला न्याय देऊ शकत नाहीत. या तीघांनी त्यांची पद्धत बदलली नाही तर टीम इंडियाला टी20 साठी नवे खेळाडू तयार करण्याची गरज आहे.या खेळाडूंनी अप्रोच बदलला पाहिजे तसं झालं नाही तर या खेळाडूंना बदलण्यात यावं. मोठ्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असतात. त्यांच्या खेळाचे परिणाम अधिक होतात. फक्त नाव मोठं असून काही होत नाही. तुम्हाला कामगिरी देखील दमदार करणे आवश्यक आहे,’ असे कपिल यांनी यावेळी सुनावलं. Norway Chess : विश्वनाथन आनंदचा धडाका कायम, वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा केला पराभव विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी आयपीएल स्पर्धा (IPL 2022) निराशाजनक ठरली. विराटनं संपूर्ण स्पर्धेत फक्त 2 अर्धशतक झळकावली. तर रोहितला एकही झळकावता आलं नाही. राहुलनं चांगले रन केले. पण, त्याला वेगानं बॅटींग न केल्याबद्दल टीका सहन करावी लागली.  विशेषत: आयपीएल प्ले ऑफमध्ये राहुलला वेगानं रन करण्यात अपयश आल्यानं लखनऊ सुपर जायंट्सला पराभव सहन करावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या