मुंबई, 18 एप्रिल : मुंबई इंडियन्सनंतर चेन्नई सुपर किंग्सचंही (Chennai Super Kings) या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. रविवारी झालेल्या थरारक मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं चेन्नईचा 1 बॉल आणि 3 विकेट्स राखून पराभव केला. चेन्नईनं दिलेलं 170 रनचं आव्हान गाठण्यात गुजरातची चांगलीच दमछाक झाली. गुजरातची टॉप ऑर्डर कोसळल्यानंतरही डेव्हिड मिलरनं (David Miller) एक बाजून लावून धरत 51 बॉलमध्ये नाबाद 94 रनची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. डेव्हिड मिलरच्या या खेळीत त्याला शिवम दुबेनं (Shivam Dube) केलेल्या चुकीचा फायदाही झाला. आरसीबी विरूद्धच्या चेन्नईच्या विजयातील हिरो असलेल्या शिवमनं मोठी चूक केल्यानं मिलर शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि चेन्नईचा पराभव झाला. गुजरातच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मोठा फटका लगावण्याचा मिलरचा प्रयत्न फसला. मिलरनं हवेत मारलेला बॉल पकडण्याची संधी मिडविकेटला उभ्या असलेल्या दुबेकडं होती. त्यानं यावेळी पुढं येऊन कॅच पकडण्याचाही प्रयत्न केला नाही. बॉल जमिनिवर पडण्याची त्यानं वाट पाहिली आणि नंतर थ्रो केला. दुबेच्या या कृतीवर ब्राव्होचा विश्वास बसत नव्हता. कॅप्टन रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील चांगलाच संतापला होता. त्यानं रागानं डोक्यावरची टोपी काढली. तो ती टोपी खाली टाकणार होता, पण त्यानं कसंबसं स्वत:ला शांत केलं.
हा प्रकार घडला त्यावेळी मिलर 78 रनवर होता आणि गुजरातला विजयासाठी आणखी 50 रन हवे होते. दुबेनं ती कॅच पकडली असती तर कदाचित मॅचचं चित्रं वेगळं ठरलं असतं. अर्थात दुबे ती कॅच पकडण्यासाठी पुढे पळाला होता, पण डोळ्यावर फ्लड लाईट्स आल्यानं तो थांबला असं रिप्लेमध्ये दिसलं. IPL 2022 : विराट कोहलीच्या टिप्स कामी, चेन्नईतील पुणेकरानं केले 10 बॉलमध्ये 50 रन शिवम दुबेनं आरसीबी विरूद्ध नाबाद 95 रनची खेळी केली होती. गुजरात विरूद्ध त्याला बॅटींगमध्येही कमाल करता आली नाही. त्यानं 17 बॉलमध्ये फक्त 19 रन काढले. त्यामुळे चेन्नईला शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्त रन करता आले नाहीत.