मुंबई, 11 एप्रिल : राजस्थान रॉयल्सनं एका थरारक सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (RR vs LSG) 3 रननं पराभव केला. राजस्थानचा या सिझनमधील हा तिसरा विजय आहे. या विजयासह त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर उडी मारली आहे. राजस्थानच्या या विजयात लेग स्पिनर युजवेंद्र चहलनं 4 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. त्यासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कारही देण्यात आला. त्याचवेळी फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टनं (Trent Boult) सुरूवातीला प्रभावी बॉलिंग करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बोल्टनं 2 बॉलवर 2 विकेट्स घेत लखनऊला मोठा धक्का दिला. त्यानं पहिल्याच बॉलवर कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) बोल्ड केले. राहुल ज्या पद्धतीनं आऊट झाला ते पाहून 2021 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या आठवणी जाग्या झाल्या. पाकिस्तानचा डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीनं त्या मॅचमध्ये राहुल आणि रोहित शर्मा यांना बोल्ड केले होते. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला होता. बोल्टनं राहुलनंतर पुढच्याच बॉलवर कृष्णप्पा गौतमला एलबीडब्ल्यू केलं. त्यानं या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 30 रन देत 2 विकेट्स घेतल्या.
राहुल आणि गौतमनंतर जेसन होल्डरही लगेच आऊट झाला. लखनऊची अवस्था 14/3 अशी झाली होती, पण हुड्डा आणि डिकॉकने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राजस्थानकडून चहलने 4 विकेट घेतल्या, तर ट्रेन्ट बोल्टला 3 आणि प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. ICC कडून पाकिस्तानची फजिती, एकमतानं फेटाळला PCB चा प्रस्ताव! BCCI चा दबदबा वाढला लखनऊविरुद्धच्या या विजयामुळे राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने या मोसमात 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे लखनऊची टीम क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, लखनऊने 5 पैकी 3 विजय मिळवले आणि 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.