JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / RCB vs GT, Dream 11 Team Predication : विराटला फॉर्म गवसणार? 'या' खेळाडूंची करा तुमच्या टीममध्ये निवड

RCB vs GT, Dream 11 Team Predication : विराटला फॉर्म गवसणार? 'या' खेळाडूंची करा तुमच्या टीममध्ये निवड

RCB vs GT: या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) खेळाकडं असेल. आरसीबीच्या माजी कॅप्टननं या सिझनमधील 9 मॅचमध्ये फक्त 128 रन केले आहेत.

जाहिरात

hopperhq नं 2022 मधील इन्स्टाग्राम रिच लिस्ट प्रसिद्ध केलीय. या यादीवरून विराट आजही सोशल मीडियावर सुपर हिट असल्याचं सिद्ध झालंय. विराट मागच्या वर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 5 कोटी घेत होता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल स्पर्धेत शनिवारी दोन सामने होणार आहेत. यापैकी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यात होत आहे. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) खेळाकडं असेल. आरसीबीच्या माजी कॅप्टननं या सिझनमधील 9 मॅचमध्ये फक्त 128 रन केले आहेत. त्याला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. मागगच्या तीन सामन्यांमध्ये मिळून त्यानं फक्त 9 रन केले आहेत. यापैकी दोन सामन्यांमध्ये तर विराट पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झाला होता. विराट खराब फॉर्ममध्ये असल्यानं कॅप्टन फाफ ड्यूप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या आरसीबीच्या अनुभवी खेळाडूंना मोठी खेळी करण्याची गरज आहे. त्यानंतर आरसीबीकडं दिनेश कार्तिकसारखा फिनिशर आहे. कार्तित या सिझनमध्ये चांगल्याच फॉर्मात आहे. आरसीबीच्या बॅटींगनं मागील दोन सामन्यांमध्ये निराशा केल्यानं त्यांचा पराभव झाला. आरसीबी सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकार आहे. ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकावाच लागेल. दुसरिकडं गुजरात टायटन्सनं आठपैकी सात सामने जिंकले असून त्यांची टीम 14 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. राहुल तेवातिया आणि राशिद खान या जोडीनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध थरारक विजय मिळवून दिला होता. गुजरातच्या टीममध्ये अनेक मॅच विनर्स आहेत. शेवटच्या बॉलपर्यंत लढण्याची त्यांच्यात जिद्द असून त्यामुळे अनेक सामने गुजरातनं शेवटच्या ओव्हर्समध्ये जिंकले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूनं Elon Musk कडं केली Swiggy खरेदी करण्याची मागणी, मिळालं लगेच उत्तर GT vs LSG Dream 11 Team Predication कॅप्टन: फाफ डूप्लेसिस व्हाईस कॅप्टन: हार्दिक पंड्या विकेट किपर: दिनेश कार्तिक बॅटर: फाफ डूप्लेसिस, ऋद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, डेविड मिलर, ऑल राउंडर्स: राशिद खान, हार्दिक पंड्या, वानिंदु हसरंगा बॉलर: जोश हेजलवुड, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या