Home /News /sport /

टीम इंडियाच्या खेळाडूनं Elon Musk कडं केली Swiggy खरेदी करण्याची मागणी, मिळालं लगेच उत्तर

टीम इंडियाच्या खेळाडूनं Elon Musk कडं केली Swiggy खरेदी करण्याची मागणी, मिळालं लगेच उत्तर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कनं (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केल्याची सध्या सर्वच क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच्या खेळाडूनं त्यांच्याकडं स्विगी खरेदी करण्याची मागणी केली.

    मुंबई, 30 एप्रिल : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कनं (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केल्याची सध्या सर्वच क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर अनेक जण ट्विटरवर चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी मस्क यांनी करावी अशी मागणी ट्विटरच्याच माध्यमातून केली आहे. मस्क यांच्याकडं या पद्धतीची मागणी करणाऱ्यांच्या यादीमध्ये टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलचाही (Shubman Gill) समावेश झाला आहे. गिल सध्या गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्यानं शुक्रवारी रात्री एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यानं एलॉन मस्क यांनाही टॅग केले होते. 'एलॉन मस्क कृपया स्विगी (Swiggy) खरेदी करा. ज्यामुळे डिलिव्हरी वेळेवर होईल.' शुभमन गिलच्या या ट्विटला मस्क यांच्याकडून नाही पण फूड डिलिव्हरी स्टार्ट-अप असलेल्या स्विगीकडून लगेच उत्तर आलं. 'हाय शुभमन, ट्विटरवर असो किंवा ट्विटरच्या बाहेर तुझ्या ऑर्डरबाबत सर्व योग्य व्हावं अशी आमची इच्छा आहे. (तू ऑर्डर केली असलीस तर) त्याचे डिटेल्स आम्हाला डीएम (डायरेक्ट मेसेज) कर. आम्ही त्यावर वेगानं काम करू'  काही वेळानंतर स्विगीनं आणखी एक ट्विट करत 'आम्हाला तुझ्याकडून माहिती कळाली. लवकरच भेटू' असं उत्तर दिलं. मुंबई इंडियन्सच्या कोचमुळे बदलली कृणालची बॉलिंग, 7 महिन्यांमध्ये दिसली जादू एलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी ट्विटरमध्ये 9% हिस्सेदारी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटर इंकचा 100% हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Elon musk, Ipl 2022, Twitter

    पुढील बातम्या