JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, RCB vs KKR : पहिल्या विजयासाठी 'या' Playing11 सह उतरणार बँगलोर

IPL 2022, RCB vs KKR : पहिल्या विजयासाठी 'या' Playing11 सह उतरणार बँगलोर

आयपीएल स्पर्धेतील सहावी मॅच आज (बुधवार) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. दोन्ही टीमची ही दुसरी मॅच आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च : आयपीएल स्पर्धेतील सहावी मॅच आज (बुधवार) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर ही मॅच होईल. दोन्ही टीमची ही दुसरी मॅच आहे. आरसीबीची या स्पर्धेतील सुरूवात खराब झाली आहे. त्यांना पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये  205 रनचं संरक्षण करता आलं नाही. आता दुसऱ्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) केकेआरचं त्यांच्यापुढे आव्हान आहे. दोन्ही टीममध्ये आजवर झालेल्या लढतीमध्ये कोलकातानं 16 तर आरसीबीनं 13 सामने जिंकले आहे. मागील आयपीएलमध्ये झालेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांत केकेआरनं विजय मिळवला होता. आता फाफ ड्यू प्लेसिसच्या (Faf du Plessis) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या बँगलोरला मागच्या आयपीएल ‘प्ले ऑफ’ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. कशी असेल Playing11? आरसीबीच्या बॅटर्सनी पंजाब विरूद्ध दमदार बॅटींग केली होती. फाफ ड्यू प्लेसिसनं अर्धशतक झळकावलं. विराट कोहलीनं त्याला साथ दिली. दिनेश कार्तिकनं शेवटी जोरदार फटकेबाजी केली. नवोदीत अनुज रावतनंही 20 रनची खेळी करत सर्वांना प्रभावित केले. त्याशिवाय आरसीबीकडे शेरफेन रदरफोर्ड हा आणखी एक आक्रमक खेळाडू आहे. शाहबाज अहमद आणि हसरंगा हे दोन ऑलराऊंडर आरसीबीकडं आहेत. शाहबाजला पंजाब विरूद्ध फार संधी मिळाली नाही. तर हसरंगानं 2 विकेट्स घेतल्या होत्या. आता या दोघांकडूनही आणखी चांगल्या कामगिरीची आरसीबीला अपेक्षा असेल. आरसीबी बॉलिंगमध्ये एक बदल करण्याची शक्यता आहे. पंजाब विरूद्ध खेळलेल्या आकाशदीपच्या जागी सिद्धार्थ कौलला संधी मिळू शकते. त्याचबरोबर हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि डेव्हिड विली या फास्ट बॉलर्सनंही चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. पंजाब विरूद्ध हे सर्व फेल गेले होते. ‘…तर मला 15 कोटी सहज मिळाले असते’, IPL स्पर्धेच्या दरम्यान शास्त्रींचा मोठा दावा! आरसीबीची संभाव्य Playing 11 : फाफ ड्यू प्लेसिस (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, डेव्हिड विली,  मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल/आकाशदीप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या