मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी ‘करो वा मरो’ असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर गुरूवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) पहिल्यांदा बॅटींग करत आरसीबीसमोर 169 रनचं टार्गेट ठेवलं होतं. विराटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीनं हे टार्गेट 8 विकेट्स राखून पूर्ण केलं आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) फॉर्मसाठी झगडणाऱ्या विराटनं गुजरात विरूद्ध आत्मविश्वासानं खेळ केला. त्यानं 54 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 73 रन केले. विराटच्या या खेळीमुळे त्याचे फॅन्स खूश असून सोशल मीडियावरही या खेळीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आरसीबीच्या खात्यात आता 14 मॅचमध्ये 8 विजयांसह 16 पॉईंट्स झाले आहेत.प्ले-ऑफच्या उरलेल्या दोन जागांसाठी आता राजस्थान (Rajasthan Royals), दिल्ली (Delhi Capitals) आणि आरसीबी या तीन टीममध्ये रेस आहे. राजस्थान आणि आरसीबीच्या खात्यात 16 पॉईंट्स आहेत तर दिल्लीकडे 14 पॉईंट्स आहेत, पण राजस्थानचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित आहे, कारण त्यांचा नेट रन रेट या दोन्ही टीमपेक्षा चांगला आहे. IPL 2022 : ‘त्या’ 90 मिनिटांमुळे बदलला कोहलीचा फॉर्म, मॅचनंतर सांगितलं ‘विराट’ खेळीचं रहस्य गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे, पण त्यांना आता मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, पण जर या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर मात्र आरसीबीचं प्ले-ऑफ खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळेल.