मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8 विकेट्सनं पराभव केला. त्याचबरोबर त्यांचा विकेट किपर-बॅटर मॅथ्यू वेड (Mathhew Wade) देखील वादामध्ये सापडला सापडला. वेडला थर्ड अंपायरच्या निर्णायवर आदळ आपट करून नाराजी व्यक्त करणे महागात पडले आहे. काय घडले प्रकरण? आरसीबी विरूद्धच्या मॅचमध्ये मॅक्सवेलच्या बॉलिंगवर वेडने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, यानंतर आरसीबीने अपील केलं तेव्हा अंपायरने त्याला आऊट दिलं. अंपायरच्या या निर्णयानंतर क्षणाचाही विलंब न घालवता वेडने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये बॉलने बॅटजवळून जाताना दिशा बदलल्याचं दिसत होतं, पण अल्ट्राएजमध्ये कोणताही स्पाईक दिसला नाही, यामुळे थर्ड अंपायरने मैदानातल्या अंपायरचा आऊटचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर मॅथ्यू वेडचा पारा चढला. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने हेल्मेट फेकून दिलं, तसंच बॅटही आपटली. मॅथ्यू वेडच्या या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणात वेड आयपीएल ‘कोड ऑफ कंडक्ट’ अंतर्गत दोषी ठरला आहे. त्याला यावेळी फक्त समज देऊन सोडण्यात आलंय. आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्ह्यात वेड दोषी ठरला आहे. या प्रकरणात मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम असतो. वेडनंही ही चूक मान्य केलीय. IPL 2022 : …. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन गुजरातने दिलेलं 169 रनचं आव्हान आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 115 रनची पार्टनरशीप झाली. आरसीबीकडून विराट कोहलीने 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली, तर डुप्लेसिस 38 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले