JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2002 : गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय, राशिद खानवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

IPL 2002 : गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय, राशिद खानवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

आयपीएल स्पर्धेत आज (सोमवार) होणाऱ्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन नव्या टीम पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. गुजरातनं या मॅचपूर्वी राशिद खानवर (Rashid Khan) मोठी जबाबदारी सोपवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 28 मार्च :**आयपीएल स्पर्धेत आज (सोमवार) होणाऱ्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स  (Gujarat Titans) या दोन नव्या टीम पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातचा कॅप्टन आहे. या टीमनं आयपीएल ऑक्शनपूर्वी टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि अफगाणिस्तानचा बॉलर राशिद खान (Rashid Khan ) यांना करारबद्ध केले होते. T20 क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या राशिद खानची गुजरातनं उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. राशिदने टी20 क्रिकेटमधील 309 इनिंगमध्ये 17 च्या सरासरीनं 435 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं सर्वात कमी वयामध्ये हा रेकॉर्ड केला आहे. 17 रन देत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा इकोनॉमी रेट 6.34 असून 8 वेळा 4 विकेट्स आणि 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. राशिदनं टी20 इंटरनॅशनलमध्येही 105 विकेट्स घेतल्या असून त्यामुळे त्याची जगभरातील टी20 लीगमध्ये निवड होते. 23  वर्षांच्या राशिदचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्डही दमदार आहे. त्याने 76 मॅचमध्ये 93 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट 6.33 आहे. तो या सिझनमध्ये 100  विकेट्सचा टप्पा पूर्ण करू शकतो. राशिदनं आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. तो मागिल सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळला होता. त्यामध्ये त्यानं 18 विकेट्स घेतल्या होत्या.राशिद या आयपीएलपूर्वी हैदराबादच्या टीममधून बाहेर पडला. त्याला गुजरातनं 15 कोटींमध्ये खरेदी केले. ‘KKR मध्ये कुलदीप सेफ नव्हता’, टीम इंडियाच्या खेळाडूचा पहिल्याच मॅचनंतर मोठा दावा गुजरात टायटन्सची टीम : शुभमन गिल,  ऋद्धीमान साहा, अभिनव मनोहर, विजय शंकर, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, डोमनिक ड्रेक्स, राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज,  मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, गुरुकीरत सिंग, बी साई सुदर्शन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या