JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : Riyan Parag ला काय झालंय? एकाच मॅचमध्ये काढला 2 सिनिअर्सवर राग

IPL 2022 : Riyan Parag ला काय झालंय? एकाच मॅचमध्ये काढला 2 सिनिअर्सवर राग

राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर रियान पराग (Riyan Parag) हा या आयपीएल सिझनमध्ये त्याच्या खेळापेक्षा जास्त वर्तनामुळे चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे : राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर रियान पराग (Riyan Parag) हा या आयपीएल सिझनमध्ये त्याच्या खेळापेक्षा जास्त वर्तनामुळे चर्चेत आहे. यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या मॅचमध्ये त्यानं अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या क्वालिफायरमध्ये त्यानं टीममधील दोन सिनिअर खेळाडूंवर भर मैदानात संताप व्यक्त केला. परागचे हे वर्तन पाहून फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. काय घडला प्रकार? राजस्थान रॉयल्सच्या इनिंगमधील शेवटच्या बॉलवर जोस बटलर रन आऊट झाला. पण, तो नो बॉल असल्यानं राजस्थानला फ्री हिट मिळाली. त्यावेळी गुजरातच्या यश दयालनं आर. अश्विनला वाईड बॉल टाकला. रियान क्रिझ सोडून रन काढण्यासाठी पळाला होता. त्यानं अश्विन काय करतोय हे पाहिलं देखील नाही. रियानच्या या चुकीचा फायदा विकेट किपर ऋद्धीमान साहानं घेतला. त्यानं परागला रन आऊट केलं.  परागनं त्याची चूक मान्य केली नाही. त्यानं सर्व चूक अश्विनची असल्याचं भासवत रागानंच मैदान सोडलं.

राजस्थान रॉयल्सच्या फिल्डिंगच्या दरम्यान दुसरा प्रकार घडला. त्यावेळी परागनं मिड ऑफवरून पळत येत डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला. त्यावेळी देवदत्त पडिक्कल बॉलपर्यंत पोहचू शकला नव्हता. त्यावेळी देखील पराग चांगलाच संतापला होता. त्याच्या या वर्तनामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेलं 189 रनचं आव्हान पार करायला आलेल्या गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 रनची गरज होती. डेव्हिड मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या 20व्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलना तीन सिक्स मारून गुजरातला थरारक विजय मिळवून दिला.डेव्हिड मिलरने 38 बॉलमध्ये 178.95 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 68 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 27 बॉलमध्ये नाबाद 40 रनची खेळी केली. Women’s T20 Challenge : हरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क! राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात पराभव झाला असला तरीही त्यांना फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. बुधवारी आरसीबी आणि लखनऊ यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम राजस्थानविरुद्ध क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल.या सामन्यात विजयी झालेली टीम फायनलमध्ये गुजरात विरूद्ध खेळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या