JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 Points Table : KKR च्या विजयाचा CSK सह 2 टीमना मोठा फटका

IPL 2022 Points Table : KKR च्या विजयाचा CSK सह 2 टीमना मोठा फटका

कोलकाता नाईट रायडर्सनं सोमवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सवर (KKR vs MI) 52 रननं मोठा विजय मिळवला. या विजयासह केकेआरनं ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे : कोलकाता नाईट रायडर्सनं सोमवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सवर (KKR vs MI) 52 रननं मोठा विजय मिळवला. या विजयासह केकेआरनं ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे. केकेआरनं 2 महत्त्वाच्या पॉईंट्सची कमाई केली असून पॉईंट टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावरून 7 व्या क्रमांकावर उडी मारली आहे. केकेआरचा हा 12 सामन्यातील 5 वा विजय आहे. केकेआरचा या विजयानं फायदा झालाय. तर पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन टीमचे नुकसान झाले आहे. पंजाबची टीम सातव्या वरून आठव्या तर सीएसकेची आठव्या वरून नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या दोन्ही टीमना ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या टीम टॉपवर आहेत. बराच काळ नंबर 1 वर राहिल्यानंतर सलग दोन पराभवानंतर गुजरातची टीम दुसऱ्या क्रमांकावर घसरली असून लखनऊनं पहिला क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही टीमनं 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यात पराभव सहन केला आहे.राजस्थान रॉयल्स तिसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चौथ्या क्रमांकावर आहेत. IPL 2022: ‘माझा नवरा….’ जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नी संजनाचं Tweet Viral केकेआरचा मोठा विजय सोमवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईने केकेआरला 9 आऊट 165 वर रोखलं. पहिल्या 10 ओव्हरमध्येच केकेआरचा स्कोअर 100 च्या पुढे होता, त्यामुळे ते 200 चा टप्पा गाठणार असं वाटत होतं, पण बुमराहच्या भेदक बॉलिंगपुढे केकेआरने गुडघे टेकले. बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 10 रन देऊन 5 विकेट घेतल्या. बुमराहची आयपीएलमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची टीम 17.3 ओव्हरमध्ये 113 रनवर ऑल आऊट झाली. केकेआरकडून कमिन्सनं 3, रसेलनं 2 आणि टीम साऊदीला 1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कमिन्स दुसऱ्यांदा मुंबईसाठी व्हिलन ठरला. याआधी झालेल्या मॅचमध्ये कमिन्सने डॅनियल सॅम्सच्या एका ओव्हरमध्ये 35 रन ठोकले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या