JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, MI vs KKR Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

IPL 2022, MI vs KKR Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

MI vs KKR: आयपीएल 2022 मधील 56 वी मॅच मुंबई इंडिययन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज (सोमवार) खेळली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मधील 56 वी मॅच मुंबई इंडिययन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज (सोमवार) खेळली जाणार आहे. मुंबईचं  या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. पण, केकेआरसाठी हा ‘करो वा मरो’ चा सामना आहे. केकेआरनं हा सामना गमावला तर देखील ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीमधून बाहेर पडतील. टॉप ऑर्डरमधील सतत बदल हे केकेआरच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. केकेआरचा मागच्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध 75 रननं पराभव झाला. तर मुंबईनं गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सनं विजय मिळवला होता. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीम  10 मॅचमध्ये 4 पॉईंट्स असून ते सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. तर केकेआरचे 11 मॅचमध्ये 8 पॉईंट्स असून ते सध्या 9 व्या क्रमांकावर आहेत. आयपीएलमध्ये दोन्ही टीमच्या लढतींचा इतिहास पाहिला तर मुंबईनं 22 आणि केकेआरनं 8 सामने जिंकले आहेत. याचाच अर्थ मुंबईचं केकेआररविरूद्धच्या लढतीमध्ये नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. अय्यरची एकाकी झुंज केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) केकेआरसाठी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यानं राजस्थान रॉयल्स विरूद्ध 34, दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 42, तसंच राजस्थावन विरूद्ध पहिल्या मॅचमध्ये 85 आणि दिल्ली विरूद्ध पहिल्या मॅचमध्ये 54 रन काढले होते. त्याच्या कॅप्टनसीमध्ये केकेआरनं आत्तापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. टीममधील अन्य खेळाडूंकडून फारसं सहकार्य न मिळाल्यानं अय्यरचे प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. एक चांगला कॅप्टन अशी अय्यरची ओळख आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्येच दिल्ली कॅपिटल्सनं फायनल गाठली होती. मुंबई इंडियन्सकडून टीम डेव्हिडनं टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डेव्हिडनं गुजरात विरूद्ध 21 बॉलमध्ये नाबाद 44 रन काढले होते. तर राजस्थान विरूद्ध 9 बॉलमध्ये नाबाद 20 रन करत मुंबईला विजय मिळवून दिला होता. IPL 2022 : आरसीबीचा कॅप्टन डुप्लेसिसला स्वत:हून आऊट व्हायचं होतं, वाचा काय आहे कारण MI vs KKR Dream 11 Team Prediction कॅप्टन: श्रेयस अय्यर व्हाईस कॅप्टन: टीम डेविड विकेट किपर: इशान किशन बॅटर: श्रेयस अय्यर , टिम डेविड, रोहित शर्मा, नीतिश राणा ऑल राऊंडर्स: आंद्रे रसेल, डेनियल सैम्‍स, सुनील नरेन बॉलर्स: टीम साऊदी, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या