मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मधील बुधवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं चेन्नई सुपर किंग्सचा (RCB vs CSK) 13 रननं पराभव केला. या निकालाचा पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आणखी मोठा धक्का बसला आहे. सीएसकेच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची आयपीएल ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची शेवटची आशाही संपुष्टात आली आहे. मुंबईचा पहिल्या आठ मॅचमध्ये सलग पराभव झाला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा पराभव करत मुंबईनं पॉईंट टेबलमध्ये खातं उघडलं होतं. आरसीबीनं सीएसकेचा पराभव केल्यानं त्यांचे आता 12 पॉईंट्स झाले असून ही टीम आता पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स सर्वाधिक 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स 14 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचेही आरसीबी इतकेच 12 पॉईंट्स आहेत. पण, राजस्थानचा रनरेट जास्त असल्यानं त्यांचा तिसरा क्रमांक आहे. मुंबई इंडियन्सच्या आणखी 5 मॅच बाकी आहेत. या सर्व मॅच त्यांनी जिंकल्या तरी त्यांचे 12 पॉईंट्स होतील हे पॉईंट्स ‘प्ले ऑफ’ गाठण्यासाठी पुरेसे नसतील. 10 टीमच्या या स्पर्धेत 16 पॉईंट्स घेतलेली टीम ‘प्ले ऑफ’ साठी क्वालिफाय होईल असं मानलं जात आहे. त्याचबरोबर 14 पॉईंट्स मिळवणाऱ्या टीमला रनरेटच्या आधारावर संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सचा रनरेट सध्या -0.836 आहे. त्यामुळे उर्वरित सामने मोठ्या फरकानं जिंकूनही त्यामध्ये सुधारणा होणार नाही. IPL 2022 : धोनीनं ‘या’ गोष्टीवर फोडलं पराभवाचं खापर, मॅचनंतर म्हणाला… मुंबई इंडियन्सनंतर आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम असलेल्या सीएसकेची ‘प्ले ऑफ’ गाठण्याची आशाही आता जवळपास संपुष्टात आली आहे. सीएसकेनं 10 मॅचनंतर 3 विजय आणि 7 पराभवानंतर फक्त 6 पॉईंट्स कमावले आहेत. सीएसकेच्या आणखी 4 मॅच बाकी आहेत. या मॅच जिंकल्या तरी त्यांचे 14 पॉईंट्स होतील. हे पॉईंट्स ‘प्ले ऑफ’ साठी पुरेसे ठरणार नाहीत, असं मानलं जातॉय. तसंच सीएसकेचाही रनरेट कमी आहे. त्यामुळे आता सीएसकेला ‘प्ले ऑफ’ गाठण्यासाठी उर्वरित सर्व मॅच मोठ्या फरकानं जिंकणे आणि अन्य निकाला त्यांना अनुकूल ठरतील असे लागणे या दोन गोष्टींची गरज आहे.