मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीनं 'या' गोष्टीवर फोडलं पराभवाचं खापर, मॅचनंतर म्हणाला...

IPL 2022 : धोनीनं 'या' गोष्टीवर फोडलं पराभवाचं खापर, मॅचनंतर म्हणाला...

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा कॅप्टन झाल्यानंतर सीएसके चांगली कामगिरी करेल अशी अनेकांना अपेक्षा होती. पण, त्यांचा दुसऱ्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आणखी एक पराभव झाला आहे. या स्पर्धेच्या 49 व्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) सीएसकेचा 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या स्पर्धेतील हा दहावा पराभव आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा कॅप्टन झाल्यानंतर सीएसके चांगली कामगिरी करेल अशी अनेकांना अपेक्षा होती. पण, त्यांचा दुसऱ्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे.

धोनीनं या पराभवाचं कारण स्पष्ट केलं आहे. मॅचनंतर तो म्हणाला, 'आम्ही त्यांना 170 च्या आसपास अडवलं होतं. मला वाटलं की सेकंड हाफमध्ये पिच बॅटींगसाठी चांगलं होईल. आमच्या बॅटर्सनी चांगली सुरूवात केली. सर्व काही आमच्या योजनेप्रमाणे सुरू होते. पण, आमच्या बॅटर्सनी निराश केलं. लक्ष्यचा पाठलाग करताना परिस्थितीनुसार खेळ केला पाहिजे. आम्ही त्यामध्ये कमी पडलो. दुसऱ्यांदा बॅटींग करताना किती रन हवे आहेत, हे तुम्हाला माहिती असते. त्यावेळी फटकेबाजी केल्यापेक्षा परिस्थितीनुसार खेळ केला पाहिजे.' असे धोनीने सांगितले. पॉईंट टेबलवर लक्ष दिल्यापेक्षा  टीममधील कमतरता दूर करण्यावर भर दिला पाहिजे, असंही धोनी यावेळी म्हणाला.

चेन्नईचे आता 10 मॅचनंतर 3 विजयासह 6 पॉईंट्स आहेत. सीएसके पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीनं या विजयासह टॉप 4 मध्ये धडक मारली आहे. आरसीबीनं 11 पैकी 6 सामने जिंकले असून 12 पॉईंट्ससह ते आता चौथ्या क्रमांकावर आहेत.

IPL 2022 : DRS मुळे झाला CSK चा पराभव, RCB नं 5 बॉलमध्ये जिंकली मॅच

सीएसकेकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 56 रन केले, तर मोईन अलीने 34 आणि ऋतुराज गायकवाडने 28 रनची खेळी केली. आरसीबीकडून हर्षल पटेलला 3 आणि ग्लेन मॅक्सवेलला 2 विकेट मिळाल्या. शाहबाज अहमद, जॉश हेजलवूड आणि वानिंदु हसरंगा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. 35 रन देऊन 3 विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलचा 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni