JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : गुजरातला हरवल्यानंतर आणखी 3 टीम मुंबईच्या निशाण्यावर, कुणाचं स्वप्न होणार भंग?

IPL 2022 : गुजरातला हरवल्यानंतर आणखी 3 टीम मुंबईच्या निशाण्यावर, कुणाचं स्वप्न होणार भंग?

मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) सलग आठ पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता रोहित शर्माच्या टीमला गमवाण्यासाखं काहीच नाही. त्यामुळे त्यांचा खेळ अधिक धोकायदायक बनला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) सलग आठ पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमला गमवाण्यासाखं काहीच नाही. त्यामुळे त्यांचा खेळ अधिक धोकायदायक बनला आहे. राजस्थान रॉयल्स पााठोपाठ या सिझनमधील नंबर 1 टीम असलेल्या गुजरात टायटन्सचाही मुंबईनं पराभव केला आहे. सलग दोन विजयानंतर मुंबईनं अन्य टीमना धोक्याचा इशारा दिला आहे. विशेषत: आता तीन टीम त्यांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत 10 सामने खेळले असून त्यामध्ये 2 जिंकले असून 8 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईच्या आता कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या चार टीम विरूद्ध सामने बाकी आहेत. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. पण, अन्य तीन टीमना ‘प्ले ऑफ’ गाठण्याची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत 10 सामन्यात 5 विजय आणि 5 पराभव अशी कामगिरी केली असून 10 पॉईंट्ससह ही टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादनं दिल्लीसारखीच कामगिरी केलीय. पण, त्यांचा रनरेट कमी असल्यानं ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर कोलकाताना 10 पैकी 4 सामने जिंकलेत. 8 पॉईंट्ससह केकेआरची टीम सध्या आठव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही रोहित टेन्शनमध्ये, सर्वात मोठा मॅच विनर होणार Out मुंबई इंडियन्सनं या टीमचा पराभव केला तर त्यांचं ‘प्ले ऑफ’ चं स्वप्न भंग होऊ शकतं. दिल्ली कॅपिटल्सचे आता चार सामने बाकी आहेत. त्यांना ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्यासाठी यापैकी 3 सामने जिंकणे आवश्यक आहे. त्या परिस्थितीमध्ये मुंबईनं त्यांचा पराभव केल्यास त्यांना उर्वरित सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावे लागतील. सनरायझर्स हैदराबादचीही तीच अवस्था आहे. तर केकेआरला आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे आता या तीन्ही टीमनं मुंबई इंडियन्सपासून सावध राहावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या