मुंबई, 23 मार्च : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या आयपीएलच्या तयारीत (IPL 2022) व्यस्त आहे. रोहित, मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सहाव्यांदा स्पर्धा जिंकण्याची तयारी मुंबईनं सुरू केली आहे. टीमसोबत प्रॅक्टीस सुरू असतानाच रोहित त्याची लाडकी लेक समायरा (Samaira) बरोबरही वेळ घालवतोय. रोहितनं त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो लेकीसोबत चांगलीच मस्ती करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या जाहिरातीच्या वेळी शूट झालेला पण कुणीही न पाहिलेला खास व्हिडीओ रोहितनं त्याच्या अकाऊंटवरून शेअर केलाय. तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. रोहितसह मुंबईच्या अन्य खेळाडूंनी देखील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
मुंबई इंडियन्सनं या ऑक्शनपूर्वी कॅप्टन रोहितसह जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केले होते. तर इशान किशनला (Ishan Kishan) 15.25 कोटींची विक्रमी किंमत देऊन खरेदी केले. इशान या सिझनमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगल्या कामगिरीसाठी दबाव असेल. IPL 2022 : मुंबईच्या खेळाडूने नेट प्रॅक्टिसमध्येच पक्कं केलं टीममधलं स्थान! VIDEO पाहून व्हाल अवाक आयपीएल स्पर्धेची सुरूवात 26 मार्च रोजी होणार आहे. तर, मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) होणार आहे. मुंबईचे क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, ट्रेन्ट बोल्ट हे दिग्गज खेळाडू आता दुसऱ्या टीममध्ये आहेत. तर दिल्लीची संपूर्ण भिस्त कॅप्टन ऋषभ पंतवर (Rishabh Pant) असेल.