मुंबई, 25 एप्रिल : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईनं आत्तापर्यंत 8 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. पण, या सिझनमध्ये मुंबईची आजवरची सर्वात खराब अवस्था झाली आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सनचा पहिल्या सलग 8 मॅचमध्ये पराभव झाला आहे. या आठ पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं लाजिरवणा रेकॉर्ड केला आहे. वानखेडे स्टेडिअमवर रविवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जांट्सनं मुंबई इंडियन्सचा 36 रननं पराभव केला. आयपीएलमध्ये आजवर कोणतीही टीम पहिल्या 8 मॅचमध्ये पराभूत झालेली नाही. आत्तापर्यंत मुंबईला सहा वेळा ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यात अपयश आलंय. यापूर्वी 2008, 2009, 2016, 2018 आणि 2021 मध्ये मुंबईला ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करता आला नव्हता. पण, तेव्हाही टीमची इतकी खराब अवस्था झाली नव्हती. बाबर आझम चर्चेत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या आठ मॅच हरणारा रोहित शर्मा हा पहिला कॅप्टन बनला आहे. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईचे आठ पराभव होताच पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) चर्चेत आला आहे. यावर्षी झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) बाबरच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या कराची किंग्जला (Karachi Kings) सलग आठ पराभव सहन करावे लागले होते. IPL 2022: आयपीएलच्या धामधुमीत CSK च्या खेळाडूनं उडवला लग्नाचा बार! Photo Viral रोहितनं दिली कबुली रोहितनं या पराभवाचा दोष बॅटर्सना दिला आहे. त्याचबरोबर आपण देखील बेजाबदार पद्धतीनं शॉट मारून आऊट झाल्याची कबुली रोहितनं दिली आहे.लखनऊनं पहिल्यांदा बॅटींग करत केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर 6 आऊट 168 रन केले होते. याला उत्तर देताना मुंबईला 8 आऊट 132 पर्यंत मजल मारता आली. या सिझनमधील सलग 8 व्या पराभवानंतर रोहितनं सांगितलं की, ‘आम्ही चांगली बॉलिंग करत त्यांना कमी स्कोरवर रोखलं. पण आम्हाला चांगली बॅटींग करता आली नाही. आम्हाला पार्टनरशिप करायला हवी होती, पण तसं झालं नाही. आम्ही खराब शॉट्स खेळले. मिडल ओव्हर्समध्ये आम्ही बेजाबदार शॉट्स खेळून आऊट झालो. त्यामध्ये माझाही समावेश आहे. फक्त याच मॅचमध्ये नाही तर आम्ही संपूर्ण स्पर्धेत खराब बॅटींग केली. कोणत्याही बॅटरनं शेवटपर्यंत खेळण्याची तयारी दाखवली नाही’, असंही रोहितनं यावेळी सांगितलं