मुंबई, 25 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर डेवॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनशी लग्न केलं आहे. तो काही दिवसांपूर्वी बायो-बबलमधून बाहेर पडला होता. बायो-बबलमधून बाहेर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यानं लग्न केलं.
या दोघांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबतच्या एका वृत्तानुसार कॉनवे आणि किम गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
कॉनवेनं बायो-बबल सोडण्यापूर्वी सीएसकेनं त्याच्यासाठी एक पारंपारिक प्री वेडिंग पार्टी आयोजित केली होती
कॉनवेचा हा पहिलाच आयपीएल सिझन असून त्याला चेन्नई सुपर किंग्सनं 1 कोटींच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते.
कॉनवेनं या सिझनमध्ये फक्त 1 मॅच खेळली आहे. त्यामध्ये त्याला 3 रनच करता आले. पंजाब किंग्ज विरूद्धच्या मॅचसाठी तो उपलब्ध नसेल. लग्नानंतर पुन्हा टीममध्ये दाखल होण्यापूर्वी त्याला 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.