मुंबई, 25 एप्रिल : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चॅम्पियन टीममधील अनेक सदस्य या सिझनमध्ये दुसऱ्या टीमकडून खेळतायत. आयपीएल ऑक्शनमध्ये त्यांना पुन्हा खरेदी करण्यात मुंबईला अपयश आलं. मुंबईचा ऑल राऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) आता लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सदस्य आहे. रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लखनऊच्या इनिंगमधील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी कॅप्टन राहुलनं (KL Rahul) कृणालच्या हातामध्ये बॉल दिला. कृणालनं पहिल्याच बॉलवर कायरन पोलार्डला (kieron Pollard) आऊट केलं. पोलार्ड आऊट होऊन परत जात असताना कृणाल पुढे आला आणि त्यानं पोलार्डच्या डोक्याला पाठीमागून किस केलं. कृणाल आणि पोलार्डनं मुंबई इंडियन्सकडून बराच काळ एकत्र क्रिकेट खेळलं आहे. आता दोघांच्या टीम वेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील मैत्री कमी झालेली नाही. हेच यामधून सिद्ध झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कृणाल आणि हार्दिक हे पांड्या बंधू तसंच पोलार्ड यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. या आयपीएलमध्ये तिघंही वेगवेगळ्या टीममध्ये खेळत आहेत. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आता गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. गुजरात विरूद्धच्या मॅचमध्ये कृणालनंच हार्दिकला आऊट केलं होतं. त्यानंतर आता त्यानं पोलार्डलाही आऊट केलं. मुंबई इंडियन्स विरूद्ध कृणालनं 4 ओव्हरमध्ये 19 रन देत 3 विकेट्स घेतल्या. IPL 2022 : लखनऊच्या संपूर्ण टीमला मिळाली विजयाची शिक्षा! वाचा राहुलवर काय झाली कारवाई लखनऊ सुपर जाएंट्सने दिलेलं 169 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 132 रनच करता आल्या, त्यामुळे त्यांचा 36 रनने पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा या सिझनमधील सलग आठवा पराभव आहे. या पराभवानंतर त्यांची ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा संपुष्टात आली आहे.