JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : रोहित शर्माच्या सिक्सचा कारला 'PUNCH', चांगल्या कामासाठी मिळाले 5 लाख

IPL 2022 : रोहित शर्माच्या सिक्सचा कारला 'PUNCH', चांगल्या कामासाठी मिळाले 5 लाख

मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सवर (MI vs GT) मिळलेल्या विजयात कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आक्रमक खेळाचंही योगदान आहे. रोहित शर्मानं या खेळीच्या दरम्यान एका चांगल्या खेळाला हातभार लावला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सवर (MI vs GT) मिळलेल्या विजयात कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आक्रमक खेळाचंही योगदान आहे. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला रोहितनं आक्रमक सुरूवात करून दिली. त्यानं 28 बॉलमध्ये 153.57 च्या स्ट्राईक रेटनं 43 रन केले. या खेळीत रोहितनं 5 फोर आणि 2 सिक्स लगावले. रोहित आणि इशान किशन जोडीनं मुंबईला 74 रनची ओपनिंग करून दिली. रोहित शर्मानं यावेळी अल्झारी जोसेफच्या बॉलवर मारलेला सिक्स मैदानातील टाटा पंच (Tata Punch) कारला जाऊन धडकला. रोहितनं मारलेला बॉल या कारला लागताच 5 लाखांची कमाई झाली आहे. पण, ही कमाई रोहित शर्माला झालेली नाही. ‘टाटा मोटार्स’ आयपीएल स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉनसर आहेत. त्यांनी यापूर्वीच मैदानातील कारला कुणी मारलेला सिक्स जाऊन धडकला तर आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कला (Kaziranga National Park) 5 लाखांची देणगी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंड्याचं अभयारण्य आहे. रोहितच्या या सिक्समुळे गेंड्यांच्या संवर्धनासाठी 5 लाख रूपये मिळणार आहेत. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 177 रन केले. मुंबईकडून इशान किशननं सर्वाधिक 45 रन केले. तर रोहित शर्मानं 43 काढले. टीम डेव्हिडनं (Tim David) शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला 175 चा टप्पा ओलांडता आला. डेव्हिडनं 21 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले. त्यानं या खेळीत 2 फोर आणि 4 सिक्स लगावले. मुंबई इंडियन्स जिंकताच हार्दिकच्या नताशाचा चेहरा पडला, तर रितिका…. VIDEO गुजरात टायटन्सला 178 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांनी 5 आऊट 172 पर्यंत मजल मारली. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी सलग 8 पराभव झाल्यानं ही टीम ‘प्ले ऑफ’ च्या रेसमधून बाहेर पडली आहे. तर गुजरातचा 11 सामन्यातील तिसरा पराभव आहे. गुजरातची टीम अजूनही 16 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या