मुंबई, 24 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (KKR vs CSK) यांच्यात 26 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेतील पहिली मॅच होणार आहे. या मॅचला आता दोन दिवस शिल्लक आहेत. या मॅचपूर्वी केकेआरचा विकेट किपर - बॅटर शेल्डन जॅक्सनची (Sheldon Jackson) सर्वत्र चर्चा आहे. जॅक्सन सध्या सोशल मीडियावरही ट्रेंड आहे. एका टीव्ही चॅनलमधील खेळाडूनं जॅक्सनला विदेशी खेळाडू म्हंटल्यानं जॅक्सनची चर्चा आहे. सौराष्ट्राकडून बराच काळ देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या जॅक्सनला केकेआरनं मेगा ऑक्शनमध्ये 60 लाखांमध्ये खरेदी केले. टीव्ही एक्स्पर्टनं त्याचं नाव विदेशी खेळाडूंच्या यादीत टाकल्यानं सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आले.
सोशल मीडियावर या विषयावर बराच गदारोळ झाल्यानंत त्या टीव्ही शो मधील उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राहुल रावत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी संपूर्ण कार्यक्रमात एकदाही शेल्डन जॅक्सन विदेशी खेळाडू असल्याचं म्हंटलं नाही. त्याला विदेशी खेळाडू म्हंटल्याचं माझ्या लक्षात आलं नाही, ही माझी चूक झाली. कृपया संपूर्ण कार्यक्रम पाहा. भारतीय क्रिकेटमध्ये शेल्डन जॅक्सननं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे.’ असे रावत यांनी सांगितले.
जॅक्सननं रेल्वेकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो सौराष्ट्राकडून क्रिकेट खेळू लागला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 79 मॅचमध्ये 50.39 च्या सरासरीनं त्याने 5 हजार 947 रन केले आहेत. यामध्ये 19 शतक आणि 31 अर्धशतकाचा समावेश आहे.TV शो मधील क्रिकेट एक्स्पर्ट केकेआरच्या टीमवर चर्चा करत असताना त्यांनी शेल्डन जॅक्सनचा विदेशी खेळाडूंच्या पर्यायामध्ये समावेश केला. त्यामुळे वाद निर्माण झाला. Women’s World Cup : पाकिस्ताननं दिला टीम इंडियाला धोका, मिताली राजची काळजी वाढली दोन वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपज जिंकलेल्या केकेआरनं यंदा श्रेयस अय्यरची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. या टीममध्ये जॅक्सनसह इंग्लंडचा सॅम बिलिंग्ज हा विकेट किपर म्हणून पर्याय आहे.