मुंबई, 24 मार्च : महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup) टीम इंडियाची अडचण वाढली आहे. भारतीय टीमनं (Team India Women) बांगलादेश विरूद्ध मोठा विजय मिळवत सेमी फायनलच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं होतं. भारताच्या या मार्गात पाकिस्ताननं अडथळा आणला आहे. पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan Women vs England Women) यांच्या मॅचनं हा अडथळा निर्माण झाला आहे. इंग्लंड विरूद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानची संपूर्ण टीम फक्त 105 रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानला संपूर्ण 50 ओव्हर्सही बॅटींग करता आली नाही. त्यांनी फक्त 41.3 ओव्हर्स बॅटींग केली. पाकिस्तान टीममधील 8 जणींना दोन अंकी रन करण्यातही अपयश आले. पाकिस्तानच्या या फ्लॉप शोनं इंग्लंडचा मोठा विजय नक्की आहे. पॉईंट टेबलची परिस्थिती काय? महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील साखळी सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत. भारतीय टीमनं 6 मॅचमध्ये 6 पॉईंट्स कमावले असून सध्या टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचेही पाकिस्तान विरूद्धच्या विजयानंतर 6 मॅचमध्ये 6 पॉईंट्स होणार आहेत. तसंच या मोठ्या विजयाचा फायदा इंग्लंडला रनरेटमध्ये सुधारणा करण्यासही होणार आहे.
A dominating performance by England as they bowl out Pakistan for 105.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
Katherine Brunt and Sophie Ecclestone finish with three wickets each 🔥#CWC22 pic.twitter.com/T6UdguXvvy
वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मॅच पावसानं रद्द झाली. त्यामुळे दोन्ही टीमना एक-एक पॉईंट मिळाला आहे. ही मॅच रद्द झाल्यानं दक्षिण आफ्रिकेचे 9 पॉईंट्स झाले असून ही टीम सेमी फायनलसाठी पात्र झाली आहे. तर ऑस्ट्रेलियानं 12 पॉईंट्ससह यापूर्वीच सेमी फायनलमध्ये जागा मिळवलीय. वेस्ट इंडिजचे सध्या 7 पॉईंट्स असून त्यांनाही सेमी फायनलमध्ये जाण्याची मोठी संधी आहे. सेमी फायनलमधील चौथ्या जागेसाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात स्पर्धा आहे. इंग्लंडची शेवटची लढत बांगलादेश विरूद्ध होणार आहे. त्यामध्येही इंग्लंडला मोठा विजय मिळवण्याची संधी आहे. तर टीम इंडियाची शेवटची लढत ही या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आहे. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये टीम इंडियाला ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागेल. IPL 2022 : मुंबई आणि चेन्नईमधील ‘या’ 3 खेळाडूंमध्ये आहे एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजची ही शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा आहे. मितालीला तिच्या दीर्घ कालावधीमध्ये आजवर एकदाही वर्ल्ड कप स्पर्धा जिंकता आलेली नाही. पाकिस्ताननं इंग्लंड विरूद्ध केलेल्या खराब कामगिरीनं टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान धोक्याात आलं आहे. त्यामुळे मितालीची काळजी वाढली आहे.