मुंबई, 6 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) आता रंगात येत आहे. प्रत्येक मॅचनंतर पॉईंट टेबलमध्ये बदल होत आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या आयपीएलमधील सर्वात यशस्वी दोन टीमना अद्याप खातं उघडता आलेलं नाही. माजी विजेते सनरायझर्स हैदरबादची (Sunrisers Hyderabad) देखील हीच अवस्था आहे. त्याचवेळी नवोदीत गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) स्पर्धेची सुरूवात दमदार केली आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या गुजरातनं पहिले दोन्ही सामने जिंकले असून ही टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या टॉप 4 मध्ये आहे. टीमच्या या कामगिरीमुळे गुजरातचा कोच आशिष नेहरा (Ashish Nehara) चांगलाच खूश आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या विजयात नेहराची रणनीती यशस्वी झाली. त्यामुळे त्याचा मूड सध्या एकदम आनंदी आहे. गुजरात टायटन्सनं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडरलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे नेहरा मैदानात प्रॅक्टीस करताना नाचताना दिसत आहे. ‘नेहराजींचा जलसा, फुल स्विंगमध्ये’ असं कॅप्शन गुजरातनं या व्हिडीओला दिलं आहे.
यापूर्वी दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर टीमचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये आशिष नेहरा कागद घेऊन बसलेला होता. आशिष नेहराच्या या फोटोवर फॅन्सनी मजेशीर कॅप्शन दिले आहेत. आयपीएलमध्ये टीमचे कोच लॅपटॉप आणि प्लानिंगसोबत येतात, पण नेहराजी एका कागदाच्या तुकड्याने विरोधकांना चितपट करत आहेत, अशा प्रतिक्रिया फॅननं दिली होती. IPL 2022 : मुंबई ते पुणे प्रवास, सचिन तेंडुलकरने मराठी गाण्यावर धरला ताल! VIDEO गुजरात टायटन्सची पुढील मॅच 8 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध होणार आहे. त्या मॅचमध्ये विजय मिळवत हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचा नेहराचा प्रयत्न असेल.