मुंबई, 4 मे : लियाम लिव्हिंगस्टोननं (Liam Livingstone) पुन्हा एकदा आक्रमक बॅटींग केली आहे. आयपीएल 2022 मधील (IPL 2022) मंगळवारी झालेल्या लढतीमध्ये त्यानं गुजरात टायटन्स विरूद्ध 10 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. त्यावं यावेळी 117 मीटर लाबं सिक्स लगावला. हा या आयपीएल सिझनमधील सर्वात मोठा सिक्स आहे. लिव्हिंगस्टोनच्या सिक्सनं पंजाबनं 144 रनचं आव्हान 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पंजाबचा हा 10 मॅचमधील पाचवा विजय आहे. या विजयासह पंजाबचं ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याचं आव्हान कायम आहे. पंजाब किंग्जकडून 16 वी ओव्हर टाकण्यासाठी मोहम्मद शमी (Mohammad Shami) आला. लिव्हिंगस्टोननं त्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डीप बॅकवर्ड स्केवअरवर 117 मीटर लांब सिक्स लगावला. त्याचा हा सिक्स पाहून गुजरात टायटन्सचा राशिद खानला (Rashid Khan) विश्वास बसला नाही. त्यानं जवळ येऊन लिव्हिंगस्टोनची बॅट चेक केली. लिव्हिंगस्टोननं त्या ओव्हरमध्ये आणखी दोन सिक्स आणि दोन फोर लगावले.
यापूर्वी या आयपीएल सिझनमधील सर्वात लांब सिक्स मुंबई इंडियन्सच्या डेवाल्ड ब्रेविसनं लगावला होता. त्यानं पंजाब किंग्ज विरूद्ध 112 मीटर लांब सिक्स मारला होता. लिव्हिंगस्टोननं मंगळवारी त्याला मागे टाकले. तिसरा सर्वात लांब सिक्स देखील लिव्हिंगस्टोनच्याच नावावर आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध 108 मीटर लांब सिक्स लगावला होता. पंजाबकडून शिखर धवनने (Shikhar Dhawan) 53 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले, याशिवाय भानुका राजपक्षेने 28 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. पंजाब किंग्सने 16 व्या ओव्हरमध्येच हा सामना जिंकल्यामुळे त्यांचा नेट रन रेट सुधारला आहे. IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या एका चुकीचा संपूर्ण टीमला फटका, पंजाबचे जोरदार कमबॅक या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर पंजाबच्या बॉलर्सनी गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 143 वर रोखलं. साई सुदर्शनने 50 बॉलमध्ये नाबाद 65 रनची खेळी केली. पंजाबकडून रबाडाने सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, याशिवाय अर्शदीप सिंग, ऋषी धवन आणि लिव्हिंगस्टोन यांना 1-1 विकेट मिळाली.