मुंबई, 26 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील पहिली मॅच आज (शनिवारी) चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. मागच्या सिझनची फायनल खेळलेल्या या दोन्ही टीमचे यंदा नवे कॅप्टन आहेत. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) दोन दिवसांपूर्वी रविंद्र जडेजाला (Ravindara Jadeja) कॅप्टनसी सोपवली आहे. तर कोलकातानं श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. गेल्या सिझनमध्ये आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या सीएकेला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धक्का बसला आहे. दीपक चहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे टीममध्ये दाखल झालेला नाही. तर मोईन अली (Moeen ALi) देखील व्हिसा मिळण्यास विलंब झाल्यानं उशीरा टीममध्ये दाखल झाला आहे. मोईन पहिली मॅच खेळणार नाही. त्यामुळे सीएसकेच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार आहेत. केकेआरचेही सर्व खेळाडू निवडीसाठी अजून उपलब्ध नाहीत. फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि ओपनर एरॉन फिंच (Aaron Finch) सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. फिंच पाकिस्तानमध्ये लिमिटेड ओव्हर्सची सीरिज खेळणार आहे. तर पॅट कमिन्स दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी 30 तारखेला मेलबर्नमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कमिन्स पहिल्या तीन मॅच खेळू शकणार नाही. Good News! Women’s IPL चा मार्ग मोकळा, BCCI नं घेतला ऐतिहासिक निर्णय CSK vs KKR Dream 11 कॅप्टन - श्रेयस अय्यर व्हाईस कॅप्टन - रविंद्र जडेजा विकेटकीपर: सॅम बिलिंग्स बल्लेबाज: श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, अंबाती रायुडू, डेवॉन कॉनवे ऑल राउंडर्स: रविंद्र जडेजा, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर बॉलर्स: ड्वेन ब्रावो, टिम साउदी, क्रिस जॉर्डन