JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : श्रीलंकेला हरवल्यानंतर रोहित शर्मा घेणार 'ही' जबाबदारी, कॅप्टननं केला खुलासा

IND vs SL : श्रीलंकेला हरवल्यानंतर रोहित शर्मा घेणार 'ही' जबाबदारी, कॅप्टननं केला खुलासा

रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणूनही जोरदार सुरूवात केली आहे. मोहालीमध्ये रोहितनं या प्रकारातील कॅप्टन म्हणून पदार्पण केले. या विजयानंतर नवी जबाबदारी घेणार असल्याचं रोहितनं जाहीर केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च : रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणूनही जोरदार सुरूवात केली आहे. मोहालीमध्ये रोहितनं या प्रकारातील कॅप्टन म्हणून पदार्पण केले. रोहितच्या पहिल्याच कॅप्टनसी टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 1 इनिंग आणि 222 रननं मोठा पराभव केला. यापूर्वी भारतीय टीमनं श्रीलंकेविरूद्धची टी20 सीरिज देखील 3-0 या फरकानं जिंकली आहे. अनुभवी ओपनर आणि कॅप्टन रोहित शर्मानं टेस्ट मॅचनंतर त्याच्या नव्या जबाबदारीचा खुलासा केला आहे. ‘तुम्हाला ‘बेंच स्ट्रेंथ’ तयार करायची असेल तर त्याचा आत्तापासूनच विचार करायला हवा. तरंच भारतीय क्रिकेटचं भविष्य सुरक्षित होईल. हे माझ्यासमोरील एक आव्हान आहे.  मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मला टीमची बेंच स्ट्रेंथ तयार करायची आहे. या खेळाडूंना मी कसं खेळवणार? त्याचबरोबर जे टीमच्या बाहेर बसले आहेत, त्यांचा आत्मविश्वास कसा देता येईल? हे पाहणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे,’ असे रोहितने सांगितले. रोहित पुढे म्हणाला की, ‘खेळाडूंना संधी मिळाल्यावर त्यांना काय करायचं आहे, त्यांचं लक्ष्य काय आहे, हे स्पष्ट हवे. त्याचा आमच्या कामगिरीवर परिणाम होईल. आम्ही मॅच जिंकू किंवा हरू. कोणताही खेळाडू टीममध्ये आल्यानंतर लगेच मॅच जिंकून देईल, अशी अपेक्षा करता येणार नाही. पण, तुम्हाला मॅच तर जिंकायलाच हवी. मॅच जिंकण्यासाठी अन्य गोष्टी देखील केल्या पाहिजेत. IPL 2022 : विजेतेपद राखण्यासाठी CSK मैदानात, धोनीचा निर्णय ठरणार मास्टरस्ट्रोक! टीमममध्ये चांगले वातावरण हवे. त्यामुळे खेळाडू मैदानात जाऊन त्यांचं काम करू शकतील. त्यांच्यावर अतिरिक्त दबाव येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दबाव असतोच. पण, बाहेरच्या दबाव अनावश्यक आहे. अंतरिक दबाव असेल तर तो ठीक आहे.’  असे  रोहितने स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या