जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : विजेतेपद राखण्यासाठी CSK मैदानात, धोनीचा निर्णय ठरणार मास्टरस्ट्रोक!

IPL 2022 : विजेतेपद राखण्यासाठी CSK मैदानात, धोनीचा निर्णय ठरणार मास्टरस्ट्रोक!

IPL 2022 : विजेतेपद राखण्यासाठी CSK मैदानात, धोनीचा निर्णय ठरणार मास्टरस्ट्रोक!

आयपीएल स्पर्धेचं (IPL 2022) वेळापत्रक जाहीर झालं आहे. या सिझनमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मार्च : आयपीएल स्पर्धेचं (IPL 2022) वेळापत्रक जाहीर झालं आहे. या सिझनमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. यंदा सर्वच टीमची नव्यानं रचना झाली आहे. त्याचबरोबर दोन नव्या टीमही पहिल्यांदाच खेळणार आहेत. त्यामुळे सीएसकेला विजेतेपद राखण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं स्पर्धेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. सीएसकेनं भारतीय खेळाडूंसह सुरतच्या लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअममध्ये  (Lalbhai Contractor Stadium) ट्रेनिंग कँप सुरू केला आहे. रविवारपासून हा कँप सुरू झाला. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पहिल्या दिवसापासून या कँपमध्ये उपस्थित आहे. धोनीच्या सूचनेनंतरच सीएसकेनं सुरतमध्ये कँप घेण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक मानला जातो. धोनीनं ट्रेनिंग कँपमध्ये पहिल्या दिवशी फास्ट बॉलर्ससोबत जास्त वेळ घालवला. सीएसकेचा मुख्य फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) जखमी असल्यानं आयपीएलमधील बहुतेक सामने खेळणार नाही. त्याची कमतरता भरून काढण्याचं मोठं आव्हान धोनीसमोर आहे. सूरतमधील एका खासगी हॉटेलमध्ये सर्व टीमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये बायो-बबलच्या नियमांचं पालन करण्यात येणार आहे. टीम मॅनेजमेंट हॉटेलमधून खेळाडूंना नेण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. या प्रॅक्टीसच्या दरम्यान मैदानातील स्टाफलाही तिथं जाण्याची परवानगी नसेल. सीएसकेची टीम 22 मार्चपर्यंत सूरतमध्ये प्रॅक्टीस करणार आहे. VIDEO : विराट कोहलीवर ‘पुष्पा’ ची जादू, पाहा कुणाकडं बघत म्हणाला, मै झुकेगा नही… सीएसकेची टीम यावेळी वॉर्मअप मॅचही खेळणार आहे. या प्रॅक्टीसच्या काळात कोणता खेळाडू जखमी झाल्यास त्याला शहरातील महावीर किंवा सनशाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्येही बायो-बबलची व्यवस्था असेल. त्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खेळाडूला पुन्हा एकदा क्वारंटाईन राहावं लागणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात