मुंबई, 10 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट टीमचा बॉलर मोहम्मद सिराज सध्या खूप चर्चेत आहे. भारताचा आघाडीचा बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर सिराज अचानक चर्चेत आला. त्याला भारतीय टीममध्ये जागा मिळाली. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सीरिज खेळतोय. रविवारी (9 ऑक्टोबर 2022) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये सिराज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. त्याचा या मॅचमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील दुसरी मॅच भारतीय टीमसाठी अत्यंत महत्त्वाची होती. या मॅचपूर्वी भारत 0-1 ने पिछाडीवर होता. रविवारी झालेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजनं क्विंटन डी कॉकची विकेट घेऊन भारताला पहिलं यश मिळवून दिलं. मात्र, या मॅचमध्ये तो स्वतःचा संयम गमावतानाही दिसला. इतकंच नाही तर त्यानं अंपायरशी पंगासुद्धा घेतला. अय्यरचं शतक मात्र होम ग्राऊंडवर ईशान किशननं केली ‘ही’ चूक, मॅच जिंकली पण… नेमकं झालं काय? दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना 48 वी ओव्हर टाकण्यासाठी सिराज बॉलिंगला आला. या ओव्हरमध्ये सिराजने बॉल टाकल्यानंतर तो बॅटरला खेळता आला नाही आणि विकेटकीपर संजू सॅमसनकडे गेला. संजूने तो लगेच सिराजकडे फेकला. या वेळी नॉन स्ट्रायकर बाजूला असणारा मिलर पुढं आल्याचं पाहताच सिराजनं रन आउट करण्यासाठी त्याच्या हातातील बॉल स्टंपच्या दिशेनं फेकला. पण बॉल स्टंपला न लागता थेट बाऊंड्री बाहेर गेला. त्यामुळे अंपायरने चार रन घोषित केले. अंपायरच्या या निर्णयाचा सिराजला इतका राग आला की त्यानं थेट अंपायरशीच पंगा घेतला. हा व्हिडिओ वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सिराजनं केलेल्या या कृत्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी समाधानकारक बॉलिंग केली. मोहम्मद सिराजनं या मॅचमध्ये 38 रन देत 3 विकेट्स घेतल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने केवळ 3 रन दिले, व दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरमध्ये 7 बाद 278 रनांवर समाधान मानावं लागलं. हे लक्ष्य भारतीय टीमनं श्रेयस अय्यरची नाबाद दमदार सेंच्युरी (113) आणि त्याला ईशान किशनच्या (93) मिळालेल्या साथीच्या जोरावर सहज पूर्ण केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला.