मुंबई, 3 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारताला विजय मिळाला. या विजयामुळे भारतानं टी-20 मालिका जिंकली आहे. या सामन्यादरम्यान यजुवेंद्र चहल आणि दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू तबरेज शम्सी या दोघांमधील एक दृष्य सध्या व्हायरल झालं आहे. टीममध्ये स्थान मिळालं नसलं तरीही, या मस्तीमुळे दोघंही चर्चेत राहिले. ‘टीव्ही 9 हिंदी’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन सामने भारतानं जिंकले आहेत. त्यापैकी दुसरा सामना गुवाहाटीमध्ये शनिवारी झाला. त्यात भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 विकेट गमावत 237 रन्स केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 ओव्हरमध्ये केवळ 221 धावाच करू शकला. त्यामुळे 16 धावांनी भारतानं या मॅचमध्ये विजय मिळवला. या मॅचमध्येही स्पिनर यजुवेंद्र चहलला खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. मात्र सामन्यादरम्यान चहलनं दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू शम्सीला मारलेली लाथ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे क्विटन डिकॉक आणि एडेन मार्करम डाव सावरायचा प्रयत्न करत असताना ब्रेकमध्ये यजुवेंद्र चहल आणि तबरेज शम्सी मस्तीच्या मूडमध्ये होते. शम्सी आणि चहल या दोन्ही खेळाडूंना टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे ब्रेकच्यावेळी पाणी घेऊन दोघं मैदानावर गेले असताना त्यांची मस्ती सुरु होती. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये या दोघांना मैदानावर उतरता आलं नाही, मात्र त्यांच्या मस्तीच्या मूडमुळे ते दोघंही प्रसिद्धीच्या झोतात आले. भर मैदानात दोन दिग्गज खेळाडूंची एकमेकांना धक्काबुक्की, Video Viral चहल आणि शम्सी दोघंही आयपीलमध्ये एकत्र खेळले आहेत. आरसीबीच्या टीममध्ये हे दोघं एकत्र होते. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. शम्सी 2016 ते 2018पर्यंत आरसीबीच्या संघात होता. त्यांच्यातील मैत्रीचं दर्शन मैदानावर कॅमेऱ्यात टिपलं गेलं. चहलने शम्सीला मागून लाथ मारली. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यांवर खोडकर भाव होते. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेच्या दोन विकेट्स झटपट घेतल्या होत्या. अर्शदीपने तेंबा बावुमा आणि रिली रोसोला भोपळाही फोडू दिला नाही. डिकॉकनं मार्करमच्या साथीनं डाव सावरायचा प्रयत्न केला. त्यानंतर डेव्हिड मिलरसोबतही भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. मात्र विजय मिळवून देऊ शकले नाहीत. डिकॉकनं 48 बॉल्समध्ये नाबाद 69 रन्स केल्या. मिलरही 106 रन्सवर नाबाद राहिला. रिलेनं 19 बॉलमध्ये 33 धावा केल्या. गुवाहाटीत विराटनं जिंकली मनं… त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा किंग कोहलीनं काय केलं? दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-20 मॅच आज (3 ऑक्टोबर) इंदूरला होणार आहे. भारतानं दोन मॅचमध्ये विजय मिळवून मालिका आधीच खिशात घातली आहे.