JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : न्यूझीलंडविरूद्ध फक्त 1 विकेट घेऊनही झुलन गोस्वामीनं रचला इतिहास

Women's World Cup : न्यूझीलंडविरूद्ध फक्त 1 विकेट घेऊनही झुलन गोस्वामीनं रचला इतिहास

टीम इंडियाची (Team India Women) अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीनं (Jhulan Goswami) न्यूझीलंड विरूद्धच्या मॅचमध्ये (India vs New Zealand) नवा रेकॉर्ड केला आहे.

जाहिरात

फोटो - @BCCIWomen

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : टीम इंडियाची (Team India Women) अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीनं (Jhulan Goswami) तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. झुलन सध्या शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा खेळत आहे. या वर्ल्ड कपमधील दुसऱ्याच मॅचमध्ये तिने इतिहास रचला आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या मॅचमध्ये झूलनला फक्त एकच विकेट मिळाली, त्यानंतरही तिने इतिहास रचला आहे. झुलन आता महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी बॉलर बनली आहे. ती या यादीमध्ये संयुक्तपणे नंबर 1 वर आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या लिन फुल्सटॉनच्या नावावर होता. तिने 1982 ते 1988 या कालावधीमध्ये 20 मॅचमध्ये 39 विकेट्स घेतल्या होत्या. झुलननं न्यूझीलंडच्या कॅटे मार्टिनला आऊट करत या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. झूलन 2005 सालापासून वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे. तिने 30 मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.

संबंधित बातम्या

झुलननं आजवर 197 वन-डेमध्ये 248 विकेट्स घेतल्या असून हा देखील एक रेकॉर्ड आहे. एकाच मॅचमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी तिने 2 वेळा केली आहे. भारताची पुढील मॅच 12 मार्च रोजी वेस्ट इंडिज विरूद्ध आहे. या मॅचमध्ये झूलन लिनचा रेकॉर्ड मोडू शकते. Women’s World Cup : 1 रन आऊट आणि 4 विकेट्स, टीम इंडियाला मिळाली नवी सुपरस्टार दरम्यान,  टीम इंडियानं न्यूझीलंड विरूद्ध पहिल्यांदा बॉलिंग करत यजमान टीमला 9 आऊट 260 रनवर रोखले. भारताकडून पूजा वस्त्राकारनं (Pooja Vastrakar) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाडला 2 विकेट्स मिळाल्या. न्यूझीलंडकडून एमी सदरवेटनं सर्वाधिक 75 रन केले. तर भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या अमेलिया करनं 50 रनची खेळी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या