मुंबई, 13 जानेवारी : टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडची गणना जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. राहुल द्रविडने बुधवारी (11 जानेवारी) आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. भारतविरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वन-डे मॅचच्या पूर्वसंध्येला कोलकाता येथे टीम इंडियातील सदस्यांसोबत हे सेलिब्रेशन झालं. गुरुवारी ईडन गार्डन्सच्या मैदानावर मॅचदरम्यान राहुल द्रविडच्या कारकिर्दीची बरीच चर्चा झाली. शिवाय, राहुल द्रविडची रेकॉर्ड्स स्टेडिअममधील टीव्ही स्क्रीनवरही दाखवण्यात आले. हे पाहून द्रविड आनंदाने हसला. ‘आज तक’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 50 वर्षीय राहुल द्रविडनं 164 टेस्ट आणि 340 वन-डे मॅचेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2005 ते 2007 या कालावधीदरम्यान त्यानं टीमचं नेतृत्वही केलं होतं. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात द्रविड हा जगातील सर्वाधिक रन्स करणारा चौथा बॅटर आहे. त्याने वन-डे क्रिकेटमध्येही 10 हजार रन्सचा टप्पा पार केलेला आहे. गुरुवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या वन-डे मॅचदरम्यान द्रविडच्या नावे असलेल्या विक्रमांची यादी स्क्रीनवर दाखवण्यात आली. हे बघून द्रविडच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘या’ दिग्गज खेळाडूची तब्बेत खालावली द्रविडची कारकिर्द आत्तापर्यंत टीम इंडियामध्ये असे दोनच खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक रन्स केले आहेत. पहिला आहे सचिन तेंडुलकर आणि दुसरा राहुल द्रविड. द्रविडनं टेस्ट क्रिकेटमध्ये 52.31 च्या सरासरीनं 13 हजार 288 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 36 शतकं आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडनं वन-डेमध्ये 39.16 च्या सरासरीनं 10 हजार 889 रन्स केले आहेत. यामध्ये 12 शतकं आणि 81 अर्धशतकांचा समावेश आहे. फील्डर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा विश्वविक्रम द्रविडच्या नावावर आहे. त्यानं 301 टेस्ट इनिंग्जमध्ये 210 कॅच घेतले आहेत. द्रविडची नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय पुरुष संघाच्या हेड कोचपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विशेष कामगिरी करता आली नाही. तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठण्यात अपयशी ठरली. पण, महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाबाबत बीसीसीआयची आढावा बैठक झाली होती. त्यात राहुल द्रविडही सहभागी झाला होता. IND vs SL : कुलदीप यादवने केली कमाल, युझवेंद्र चहल झाला ट्रोल टीम इंडियाचा विजय भारतविरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वन-डे मॅचबद्दल बोलायचं झालं तर, टॉस जिंकून अगोदर बॅटिंग करणाऱ्या श्रीलंकेची टीम 39.5 ओव्हर्समध्ये 215 रन करून ऑल आउट झाली. नुवानीदु फर्नांडोनं 50 आणि कुशल मेंडिसने 34 रन्स केले. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतानं 40 बॉल बाकी असताना सहा विकेट्सच्या बदल्यात 219 रन्स केले आणि मॅच जिंकली. केएल राहुलनं नाबाद 64 रन्सची शानदार खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 36 आणि श्रेयस अय्यरनं 28 रन्सचं योगदान दिलं. तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेत मालिका विजय निश्चित केला आहे.