JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जडेजाच्या कॅप्टनसीत धमक दिसेना; नव्या टीमनं CSKवर नोंदवला थरारक विजय

जडेजाच्या कॅप्टनसीत धमक दिसेना; नव्या टीमनं CSKवर नोंदवला थरारक विजय

चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात सात बाद 210 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य दिलं आहे. धोनीने सहा चेंडूत 16 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता.

जाहिरात

MS Dhoni

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च: चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 211 धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंटने दमदार सुरूवात केली. लखनऊने सीएसकेने दिलेलं 211 धावांचं लक्ष्य सहज पार केलं. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे रंगलेल्या या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अखेरीस लखनऊ संघाने सरशी साधली. त्याचबरोबर त्यांनी हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. लखनऊचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी 10 षटकात 99 धावांची सलामी दिली. मात्र 10 षटकानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. प्रेटोरियसने 40 धावा करणाऱ्या राहुलला बाद करत सलामी जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या मनिष पांडेला तुषार देशपांडेने अवघ्या 5 धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. त्यानंतर प्रेटोरियसने पुन्हा एकदा सेट फलंदाज गळाला लावला. त्याने 45 चेंडूत 61 धावा चोपणाऱ्या क्विंटन डिकॉकची बॅट शांत केली. मात्र लखनौच्या एव्हिन लुईस आणि दीपक हुड्डाने आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. अखेरच्या दोन षटकात 34 धावा हव्या असताना. एविन लुईस व युवा आयुष बदोनी यांनी शिवम दुबे याच्या एकाच षटकात 25 धावा वसूल केल्या. अखेरच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌षटकात आयुषने षटकार ठोकत संघाचा विजय साकार केला. यासह लखनऊ संघाने आपला पहिला विजय साजरा केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात सात बाद 210 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य दिलं आहे. धोनीने सहा चेंडूत 16 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. लखनऊ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत मोठ्या धावसंख्येचा पाया घातला. सलामीवीर रॉबिन उथप्पाने 27 चेंडूत 50 धावा चोपल्या. त्यानंतर मोईन अलीने 35 तर शिवम दुबेने 49 धावांची खेळी करत सीएसकेला 150 च्या पार पोहचवले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीने स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली आणि संघाला 200 चा टप्पा पार करून दिला. धोनीने 6 चेंडूत 16 धावा चोपल्या तर रविंद्र जडेजाने 9 चेंडूत 17 धावा केल्या. लखनौकडून आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या दोन षटकात 6 चेंडूत 16 धावा चोपून आपल्या टी20 मधील 7000 धावा पूर्ण केल्या. चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 7 बाद 210 धावा केल्या. चेन्नईने शेवटच्या षटकात दोन विकेट गमावल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या