JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BBLमध्ये धावांचा पाऊस, होबार्ट हरिकेन्ससाठी पाकिस्तानचा खेळाडू ठरला खलनायक

BBLमध्ये धावांचा पाऊस, होबार्ट हरिकेन्ससाठी पाकिस्तानचा खेळाडू ठरला खलनायक

बीग बॅश लीगच्या 12 व्या हंगामातील 30 व्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. यात अॅडलेड स्ट्रायकर्सने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीग बॅश लीगच्या 12 व्या हंगामातील 30 व्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. यात अॅडलेड स्ट्रायकर्सने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग केला. होबार्ट हरिकेन्स विरुद्ध ७ विकेटने अॅडलेड स्ट्रायकर्सने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्सने 20 षटकात 4 बाद 229 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अॅडलेड स्ट्रायकर्सने ३ चेंडू राखून ३ बाद २३० धावा करत सामना जिंकला. अॅडलेड स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. होबार्ट हरिकेन्सकडून बेन मॅकडरमॉट आणि कॅलेब ज्वेल या जोडीने पहिल्या गड्यासाठी ८८ धावांची भागिदारी केली. ज्वेलने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. तर संघाच्या १२० धावा झाल्या असताना मॅकडरमॉट बाद झाला. त्याने ३० चेंडूत ५७ धावा केल्या. हेही वाचा : IND VS SL : श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय, मालिकेत बरोबरी कर्णधार मॅथ्यू वेडला फारशी चमक दाखवता आली नाही. तो केवळ ९ धावांवर बाद झाला. मिशेल ओवेनसुद्धा १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर जॅक क्रॉली आणि टीम डेव्हीड यांनी तुफान फटकेबाजी करत ४० चेंडूत ८९ धावांची अभेद्य भागिदारी करत संघाची धावसंख्या २२९ वर नेली. ही स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. स्ट्रायकर्सकडून कॉलीन डी ग्रँडहोमने सर्वाधिक दोन बळी घेतले तर राशिद खानला एकही विकेट मिळाली नाही. होबार्ट हरिकेन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अॅडलेड स्ट्रायकर्सची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर रयान गिब्सन अवघ्या पाच धावांवर बाद झाला. त्यानतंर कर्णधार मॅथ्यू शॉर्टने ख्रिस लीनसोबत डावीच सूत्रे हाती घेतली. दोघांनी शथकी भागिदारी करत धावसंख्या १३२ वर नेली. यात ख्रिस लीन २९ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला. तर अॅडम होसने २२ चेंडूत ३८ धावा केल्या. हेही वाचा :  सिडनी स्टेडियमवर उभारला महिला क्रिकेटरचा पुतळा, सचिनच्या आधी केला होता हा विश्वविक्रम कर्णधार शॉर्टने एकाकी झुंज दिली. त्याने अखेरच्या षटकात चौकार मारत शतक पूर्ण केलं आणि संघाला विजयसुद्धा मिळवून दिला. त्याने ५९ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा दिल्या. होबार्ट हरिकेनकडून खेळणारा पाकिस्तानचा गोलंदाज फहीम अशरफ सर्वात महागडा ठरला. हरिकेन्ससाठी तो खलनायक ठरला. त्याने केवळ ३.३ षटकात तब्बल ६१ धावा दिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या