मुंबई, 03 जानेवारी : बीग बॅश लीगमध्ये एका कॅचमुळे झालेला वाद शमलेला नसताना आता आणखी एका वादाची भर पडली आहे. मंगळवारी ३ जानेवारी रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर मांकडिंगमुळे वाद झाला. बीग बॅश लीगच्या सामन्यात मेलबर्न स्टार्सचा गोलंदाज एडम झाम्पाने मांकडिंग केलं. पण फलंदाजाला पंचांनी बाद दिलं नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फलंदाज बाद असल्याचं वाटत होतं, मात्र पंचांनी याचा निर्णय तिसऱ्या पंचांवर सोपवला. एमसीजीवर मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात सामना सुरू होता. मेलबर्न स्टार्सचा संघाचं अखेरचं षटक सुरू होतं. एडम झाम्पा पाचवा चेंडू टाकत असताना त्याने पाहिलं की, टॉम रॉजर्स नॉन स्ट्राइक सोडत आहे. तेव्हा झाम्पाने चेंडू स्टम्पला लावला आणि आऊट असं अपील केलं. पण पंचांनी बाद दिलं नाही. तर फलंदाज टॉम रॉजर्स मैदान सोडून निघाला होता पण पंचांनी बाद न दिल्यानं तो थांबला. हेही वाचा : एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?
पंचांनी फलंदाज टॉम रॉजर्सला यासाठी बाद दिलं नाही कारण एडम झाम्पाने त्याची पूर्ण अॅक्शन केली होती. तसंच त्यांनी तिसऱ्या पंचांच्या आधी निर्णय सांगितला होता. व्हिडीओतसुद्धा दिसतं की, पंचांनी गोलंदाजाला कसं समजावून सांगितलं की, फलंदाज मांकडिंग पद्धतीने का बाद नाही. आता यापद्धतीने बाद होण्याच्या पद्धतीला अधिकृत करण्यात आलं आहे.