मुंबई, 01 जानेवारी : बीसीसीआयने नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवारी खेळाडूंची एक यादी जारी केली आहे. ज्या खेळाडूंनी क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळ केला त्यांची नावे यामध्ये आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत ऋषभ पंत तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केल्याचं बीसीसीआय ने म्हटलं आहे. बीसीसीआयने ट्विटमध्ये म्हटलं की, 2022 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून टॉप परफॉर्मन्स करणाऱ्यात पंत आणि बुमराहचा समावेश आहे. ऋषभ पंत ने 7 सामन्यात 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 146 इतकी होती. तर जसप्रीत बुमराहने पाच सामन्यात 22 विकेट घेतल्या. हेही वाचा : ऋषभ पंत दारू पिऊन कार चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी दिली मोठी महिती एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर अव्वल फलंदाज ठरला तर मोहम्मद सिराजने गोलंदाजांमध्ये बाजी मारली. अय्यरने 17 सामन्यात 724 धावा केल्या. तर नाबाद 113 ही सर्वोच्च धावसंख्या होती. मोहम्मद सिराजने 15 सामन्यात 24 गडी बाद केले. टी२० वर्ल्ड कपसह वेगवेगळ्या मालिकांमध्ये सूर्यकुमारने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून बीसीसीआयने जाहीर केलं आहे. तर भुवनेश्वर कुमार टी20 मध्ये सर्वोत्तम गोलंदाज ठरला. सूर्यकुमारने 31 सामन्यात 1164 धावा केल्या. यात 117 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होत्या. भुवनेश्वर कुमारने 32 सामन्यात 37 विकेट घेतल्या.