JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अश्लील व्हिडीओ लीक झाल्यानंतर बाबर आझमच पाहिलं ट्विट

अश्लील व्हिडीओ लीक झाल्यानंतर बाबर आझमच पाहिलं ट्विट

व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंच्या दाव्यानुसार बाबर हा खेळाडूंच्या प्रेयसींना ब्लॅकमेल करीत असून “तू माझ्याशी संबंध ठेवलास तर मी तुझ्या प्रियकराला संघातून काढून टाकणार नाही” असे सांगत असल्याचा दावा करण्यात आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याचा दोन दिवसांपूर्वी एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत बाबर हा त्याच्या सहकारी खेळाडूच्या प्रेयसीशी अश्लील व्हिडीओ कॉल करत असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर बाबरच्या चरित्राविषयी अनेक गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. दरम्यान व्हिडीओ लीक प्रकरणानंतर पहिल्यांदाच बाबरने ट्विट करून खुलासा केला आहे. पाक कर्णधार बाबर आझम याचा वैयक्तिक व्हिडिओ ट्विटरवर एका युझरकडून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंच्या प्रेयसींना त्याच्याशी संबंध ठेवण्यास सांगत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंच्या दाव्यानुसार बाबर हा खेळाडूंच्या प्रेयसींना ब्लॅकमेल करीत असून “तू माझ्याशी संबंध ठेवलास तर मी तुझ्या प्रियकराला संघातून काढून टाकणार नाही” असे सांगत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या यूझरने बाबर आझम याचा पोस्ट केलेला व्हिडीओ खोटा आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. हे ही वाचा  : पाकचा कर्णधार बाबर आझमचे सह खेळाडूच्या प्रेयसीशी अनैतिक संबंध; अश्लील व्हिडीओ व्हायरल पाक कर्णधार बाबर आझम याने त्याचा अश्लील व्हिडीओ लीक झाल्यानंतर ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याला बाबर याने “खुश राहण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींची आवश्यकता नसते” असे कॅप्शन दिले आहे. एवढे गंभीर आरोप होत असताना बाबर आझमच्या अश्या पोस्टमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

संबंधित बातम्या

बाबर आझमवर यापूर्वी देखील एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये महिलेने मीडिया समोर येत सांगितले की, बाबर आणि मी एकाच शाळेत शिकायचो. आम्ही एकाच वस्तीत राहत होतो. त्याने मला प्रपोज केले आणि मी ते स्वीकारले. त्यावेळी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली नव्हती. महिला म्हणाली, ‘बाबरची 2014 मध्ये राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली होती. त्याच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागला. 2015 मध्ये मी बाबारपासून गरोदर राहिले. परंतु त्यावरून बाबरने माझा छळ केला आणि मला गर्भपात करण्यास भाग पाडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या