शाहनवाझ दहानी
दुबई, 10 सप्टेंबर**:** दुबईच्या मैदानात रविवारी आशिया चषकातला महामुकाबला रंगणार आहे तो श्रीलंका आणि पाकिस्तान या संघात. रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या निर्णायक लढतीआधी पाकिस्तानसाठी मात्र एक चांगली बातमी आहे. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी फिट झाला आहे. त्यामुळे बाबर आझमकडे फायनलसाठी प्लेईंग इलेव्हन निवडताना आणखी एक पर्याय हाताशी आहे. दहानीचा कसून सराव स्नायूच्या दुखापतीमुळे दहानी सुपर फोर फेरीआधीच जायबंदी झाला होता. पण आता दुखापतीतून सावरत दहानीनं सरावालाही सुरुवात केली आहे. फायनलआधी दहानीनं आज दुबई स्टेडियममध्ये सराव केला. गेल्या सामन्यात श्रीलंकेकडूनच पाकिस्तानला 5 विकेट्सनी हार स्वीकारावी लागली होती. त्यामुळे पाकिस्तानी संघात गोलंदाजीत काही बदल अपेक्षित आहेत.
पाकिस्तान तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आशिया चषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरलाय. भारतानं आजवर 7 वेळा आशिया चषक जिंकला आहे. पण पाकिस्ताननं मात्र केवळ दोनदाच आशिया चषकावर नाव कोरलंय. पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला त्याला आता 12 वर्ष उलटली आहे. 2010 साली पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्यामुळे यंदा बाबर आझमची सेना विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे 2014 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेनं आतापर्यंत 5 वेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे विजेतेपदाचा सिक्सर मारण्याची संधी लंकन संघासमोर आहे. त्यात सुपर फोर फेरीतल्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानं दसुन शनाकाच्या या संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावलेला असेल. संभाव्य प्लेईंग इलेव्हन: मोहम्मद रिझवान (विकेट कीपर) , बाबर आझम (कप्तान), फखर झमान, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हॅरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहानी किंवा मोहम्मद हसनैन.