मुंबई : आशिया कपसाठी UAE मध्ये सामने सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तुफान राडा पाहायला मिळाला. मॅचमध्ये आधीच तणावाचं वातावरण होतं. मैदानात पाकिस्तानी खेळाडूनं बॉलरला रागाच्या भरात बॅट दाखवली. हा तणाव निवळायचा बाकी की सामन्यानंतर क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये तुफान राडा केला. क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये खुर्च्या उचलून एकमेकांना मारल्या. एवढ कमी की एकमेकांच्या कॉलर धरून राडा सुरू होता. हा सगळा धुमाकूळ सामन्यानंतर स्टेडियममध्ये पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर-4 मध्ये दमदार सामना झाला. अखेरच्या ओव्हरमध्ये २ सिक्स ठोकून पाकिस्तानने हा सामना जिंकला. या विजयासह पाकिस्तानने आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याचवेळी अफगाणिस्तान विजयापर्यंत पोहोचूनही जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर जावं लागल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले. हेही वाचा- Asia Cup च्या हायव्होल्टेज सामन्यात राडा, पाकिस्तानी खेळाडूने अफगाणी बॉलरवर उगारली बॅट, VIDEO
पराभवानंतर अफगाण क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना मारहाण करत स्टेडियमची तोडफोड केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हेही वाचा- Asia Cup 2022 : 2 बॉल 2 सिक्स, थरारक सामन्यात पाकिस्तानचा विजय, भारताचं आव्हान संपुष्टात बुधवारी झालेल्या आशिया कपच्या या रंजक आणि महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 1 विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. शानदार बॉलिंग करून अफगाणिस्तानला १२९ धावांवर रोखण्यात यश आलं. त्यानंतर 9 गडी गमावून 19.2 ओव्हरमध्ये पाकिस्ताननं लक्ष्य पूर्ण केले. अफगाणिस्तान क्रिकेटप्रेमींनी यापूर्वीही अशा प्रकारचं कृत्य केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. शोएब अख्तरने याचा निषेध व्यक्त केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.