JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाला अर्शदीप पडला महागात; आधी धावांची खैरात, नंतर खाल्ले चेंडू

टीम इंडियाला अर्शदीप पडला महागात; आधी धावांची खैरात, नंतर खाल्ले चेंडू

अर्शदीपने टाकलेल्या आधीच्या षटकातील चांगल्या कामगिरीवर अखेरच्या षटकातील चार चेंडूंनी पाणी फेरले. त्यानंतर फलंदाजीतही अर्शदीपने निराशा केली.

जाहिरात

टीम इंडियाला अर्शदीप पडला महागात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 28 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात भारताला 21 धावांनी पराभूत व्हावं लागलं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 176 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता इतर एकही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. आघाडीची फळी सपशेल अपय़शी ठरली. दरम्यान, आता अर्शदीप सिंग पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींच्या निशाण्यावर आला आहे. अर्शदीपने गोलंदाजी करताना नो बॉल टाकला आणि सलग तीन षटकार दिले. त्याच्या अखेरच्या षटकात न्यूझीलंडने 27 धावा केल्या. पराभवानंतर बोलताना भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजांच्या कामगिरीवर भाष्य करताना न्यूझीलंडला 20-25 धावा जास्त दिल्या असं म्हटलं. अर्शदीपने 18 वे षटक टाकले होते. त्या षटकात अर्शदीपने 2 धावा दिल्या होत्या तर न्यूझीलंडचे दोन फलंदाज बाद झाले होते. हेही वाचा :  अर्शदीपची शेवटची ओव्हर अन् आघाडीच्या फलंदाजांची हाराकिरी, भारताच्या पराभवाला ठरले कारण अखेरच्या षटकात मात्र अर्शदीपची धुलाई झाली. त्याने टाकलेल्या आधीच्या षटकातील कामगिरीवर अखेरच्या षटकातील चार चेंडूंनी पाणी फेरले. शेवटच्या षटकातील पहिलाच चेंडू नो बॉल होता. त्यावर मिशेलने षटकार मारला. पुन्हा पुढच्या दोन्ही चेंडूवर मिशेलने षटकार खेचले तर तिसऱ्या चेंडूवर एक चौकार मारला. नो बॉल आणि तीन चेंडूत अर्शदीपने 23 धावा दिल्या. गोलंदाजीत धावांची खैरात केल्यानंतर फलंदाजीतही अर्शदीपने निराशा केली. सतराव्या षटकात पहिल्या चेंडूवर कुलदीप यादव बाद झाल्यानतंर अर्शदीप मैदानात आला. मात्र त्यानंतरच्या पाचही चेंडूवर अर्शदीपला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर अठराव्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने पहिले पाच चेंडू खेळत 1 षटकार, दोन चौकारासह 17 धावा केल्या. सहाव्या चेंडूवर अर्शदीप स्ट्राइकला होता. त्या चेंडूवरही अर्शदीपने धाव काढली नाही. 6 चेंडूत शून्यावर तो नाबाद राहिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या