न्यूझीलंडच्या फलंदाजांना कमी धावात रोखण्यात टीम इंडियाला अपयश आल्याचं पराभवानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने म्हटलं. न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेलने अखेरच्या षटकांमध्ये ३० चेंडूत नाबाद ५९ धावांची वेगवान खेळी केली. त्याने एकट्याने अर्शदीपने टाकलेल्या अखेरच्या षटकात तब्बल २७ धावा कुटल्या. भारताला याच धावा विजयासाठी पाठलाग करताना महागात पडल्या.