JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Arjun Tendulkar : अर्जुनने पूर्ण केलं सचिनचं ते स्वप्न, जे राहिलं होतं अधूरं...

Arjun Tendulkar : अर्जुनने पूर्ण केलं सचिनचं ते स्वप्न, जे राहिलं होतं अधूरं...

अर्जुन तेंडुलकरने त्याचे वडील सचिन तेंडुलकरचं स्वप्न पूर्ण केलं, जे अधूरं राहिलं होतं. अर्जुन तेंडुलकरने एक दिवस आधीच रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर : अर्जुन तेंडुलकरने त्याचे वडील सचिन तेंडुलकरचं स्वप्न पूर्ण केलं, जे अधूरं राहिलं होतं. अर्जुन तेंडुलकरने एक दिवस आधीच रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आहे. 23 वर्षांच्या अर्जुनने आपल्या वडिलांप्रमाणेच पदार्पणात शतक ठोकण्याचा विक्रम केला. गोव्याकडून खेळताना अर्जुनने ही खेळी केली. सचिनने 1988 साली रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शतक केलं होतं. अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध 120 रनची खेळी केली, तर सचिनने गुजरातविरुद्ध नाबाद 100 रन केले होते. अर्जुनने त्याच्या खेळीत 207 बॉलचा सामना केला, यात 16 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. अर्जुन तेंडुलकर जेव्हापासून मैदानात उतरला तेव्हापासूनच त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी होऊ लागली. सचिनने जेव्हा क्रिकेटला सुरूवात केली तेव्हा त्याचं स्वप्न फास्ट बॉलर होणं हे होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिन चेन्नईच्या एमआरएफ पेस अॅकेडमीमध्येही गेला. तेव्हा अॅकेडमीमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली मुख्य प्रशिक्षक होते. विराट कोहलीच्या डेडिकेशनला सलाम! आऊट झाल्यानंतर काय केलं? पाहा Photo तू फास्ट बॉलर होऊ शकत नाहीस, असं डेनिस लिली यांनी सचिन तेंडुलकरला स्पष्ट सांगितलं. लिली यांच्या या उत्तरानंतर सचिन घरी आला, पण निराश झाला नाही. उलट त्याने लिली यांचा सल्ला मान्य करून बॅटिंगवर लक्ष केंद्रीत केलं आणि पुढे इतिहास घडला. अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच्या नावासमोर ऑलराऊंडर म्हणून लिहिण्यात आलं. असा ऑलराऊंडर जो बॅटिंगसह फास्ट बॉलिंगही करू शकतो. सचिन तेंडुलकरला फास्ट बॉलर होता आलं नसलं तरी त्याच्या मुलाने मात्र फास्ट बॉलर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या